5 Km/सेकंद वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे आणखी एक संकट, NASAनं केलं अलर्ट

5 Km/सेकंद वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत आहे आणखी एक संकट, NASAनं केलं अलर्ट

नासाच्या (NASA) म्हणण्यानुसार ही उल्का अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा मोठी आहे आणि 6 जून रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 03 जून : एकीकडे जगात कोरोना थैमान घालत असताना आणखी एक संकटाची चाहुल लागत आहे. सुमारे अर्धा किलोमीटर लांबीची एक उल्का (Asteroid) पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचे नासानं सांगितलं आहे. या उल्काची गती सुमारे 5.2 किलोमीटर प्रति सेकंद किंवा ताशी 11,200 मैल प्रति तास नोंदविली जात आहे. नासाच्या (NASA) म्हणण्यानुसार ही उल्का अमेरिकेच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा मोठी आहे आणि 6 जून रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार नासाने या उल्काचं नाव रॉक-163348 (2002 NN4) ठेवलं आहे आणि अशी अपेक्षा आहे की ते पृथ्वीच्या अगदी जवळ जाईल. या उल्काची लांबी 250 ते 570 असल्याचं सांगितले जात आहे, तर 135 मीटर रूंद आहे. नासाच्या म्हणण्यानुसार ही उल्का सूर्याजवळून जात असून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करत आहे. सेंटर फॉर नेर-अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजनुसार 21 मे रोजी 1.5 कि.मी. मोठी उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून गेली होती. अशा 2000 उल्का असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांचा नासा संस्थांकडून मागोवा घेतला जात आहे.

वाचा-कोरोनाचा खुलासा करणाऱ्या डॉक्टराचा मृत्यू, ओळखताही येणार नाही असा झाला चेहरा

वैज्ञानिकांचे विशेष लक्ष

नासाच्या मते, या उल्कापिंड पृथ्वीवर आदळण्याची 1% ही शक्यता नाही, मात्र अद्याप त्याचे परीक्षण केलं जात आहे. नासाच्या मते, कधीकधी गुरुत्वाकर्षणामुळे अशा उल्का शेवटच्या क्षणी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हे रविवारी सकाळी 8:20 वाजता पृथ्वीवरून निघून जाईल. पृथ्वीच्या इतक्या जवळपासून इतका मोठा उल्का पिंड 2024 मध्येच या पुढे जाईल .नॅशनल नॉर्थ-अर्थ ऑब्जेक्ट स्ट्रॅटेजी डिपार्टमेंटच्या मते, एक किलोमीटरपेक्षा जास्त मोठी उल्का जर पृथ्वीच्या कक्षेत शिरली तर चेतावणी दिली जाते. जर कोणतीही मोठी उल्का या पृथ्वीवर आदळेल तर विनाशाचा नाश होऊ शकतो. यामुळे भूकंप, त्सुनामी आणि इतर अनेक आपत्ती येऊ शकतात.

वाचा-..आणि डोळ्यादेखत कोसळली वीज, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

वाचा-गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण...

First published: June 3, 2020, 1:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या