पृथ्वीच्या दिशेनं येत आहे आणखी एक संकट! 'या' तारखेला होणार Asteroid अटॅक

पृथ्वीच्या दिशेनं येत आहे आणखी एक संकट! 'या' तारखेला होणार Asteroid अटॅक

येत्या काही दिवसात एक उल्का (Asteroid ) पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. NASAने याबाबत अलर्ट जारी केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 24 ऑगस्ट : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारानं 2020मध्ये प्रवेश केल्यानंतर हे वर्ष वाईट ठरले आहे. आता या वर्षात आणखी एक संकटाची चाहूल लागली आहे. येत्या काही दिवसात एक उल्का (Asteroid ) पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. NASAने याबाबत अलर्ट जारी केला आहे.

नासाच्या सेंटर ऑफ नियर अर्थ ऑब्जेक्टनुसार, ही उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकते. नासाच्या मते, या उल्काचे पृथ्वीवरील अंतर 4,700 आणि 2 लाख 60 हजाक 000 मैल दरम्यान असू शकते. हा एक प्रकारचा Asteroid अटॅक असला तरी, त्याचा विशेष धोका नसेल. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या सेंटर फॉर नियर ऑब्जेक्ट स्टडीजनुसार 2 नोव्हेंबरला ही उल्का पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. या उल्काला 2018vp1 असे नाव देण्यात आले आहे.

वाचा-कोरोनाचा गर्भ नाभीवरही गंभीर परिणाम, मुंबईत गर्भपाताच्या प्रकरणाने डॉक्टर हैराण

आकडेवारीनुसार 12.968 दिवसात केलेल्या 21 अभ्यासानुसार या उल्काबाबत तीन संभाव्य परिणाम आहेत. नासाला असे आढळले आहे, ही उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याची केवळ 0.41% शक्यता आहे.

वाचा-हुकूमशहा किम-जोंग उन कोमात की मृत्यू? माजी नेत्याच्या दाव्यानंतर खळबळ

2018VP नावाची एक उल्का दोन वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो काउंटीमधील पालोमर वेधशाळेत सापडली होती. सायन्स जर्नल 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, गेल्या 700 दशलक्ष वर्षांच्या तुलनेत मागील 290 दशलक्ष वर्षांत पृथ्वी आणि चंद्र यांच्यात उल्कांचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

वाचा-आता एका WhatsApp मेसेजवर दारात उभं राहणार ATM, वाचा काय आहे SBIची नवीन सेवा

अमेरिकेच्या निवडणूकांवर संकट

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर कोरोनाचे संकट असताना, याच दिवशी उल्काही पृ्थ्वीच्या जवळून जाणार आहे. एकीकडे मतदानाच्या दिवशी लोक मतदान केंद्रावर कसे जातील हा देशातील सर्वांत मोठा प्रश्न असताना आता या उल्का अटॅकबाबतही बोलले जात आहे. ही निवडणूक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना जो बिडेन यांच्याशी आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 24, 2020, 11:09 AM IST

ताज्या बातम्या