मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आहेत तरी कुठे? अखेर मिळालं उत्तर

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आहेत तरी कुठे? अखेर मिळालं उत्तर

देश सोडून निघून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (Afghanistan president) अशरफ गनी (Ashraf Gani) कुठे आहेत, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

देश सोडून निघून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (Afghanistan president) अशरफ गनी (Ashraf Gani) कुठे आहेत, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

देश सोडून निघून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (Afghanistan president) अशरफ गनी (Ashraf Gani) कुठे आहेत, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे.

  • Published by:  desk news
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : देश सोडून निघून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (Afghanistan president) अशरफ गनी (Ashraf Gani) कुठे आहेत, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. अशरफ गनी सध्या युएईमध्ये (UAE) असून त्या देशानं गनींना सन्मानपूर्वक आसरा दिला आहे. युएईच्या परराष्ट्र मंत्रालयानं या बातमीची खातरजमा केली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या संदेशानुसार, अशरफ गनी यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून आसरा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं युएईकडून जाहीर करण्यात आलं आहे. जागेबाबत गुप्तता युएईमध्ये अशरफ गनींना नेमकं कुठं ठेवण्यात आलं आहे, याबाबत मात्र युएईकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. ते राजधानी अबूधाबीमध्ये असण्याची शक्यता काहीजणांनी व्यक्त केली असली तरी सुरक्षेची बाब म्हणून ही बाब उघड करण्यात आलेली नाही. अशरफ गनी यांना अनेक घटकांपासून जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड युएईकडून केली जात नसल्याचं सांगितलं जात आहे. तालिबानच्या आगमनानंतर सोडला होता देश तालिबाननं 15 ऑगस्ट रोजी काबूलचा ताबा घेतला. त्यापूर्वीच अशरफ गनी यांनी देश सोडला होता. स्वतःची संपत्ती घेऊन सैनिकी विमानातून ते देशाबाहेर गेल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ते नेमके कुठे गेले असावेत, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर युएईकडूनच अशरफ गनी हे आपल्या देशात असल्याचं जाहीर करण्यात आल्यामुळे याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. हे वाचा -आता मुलींनाही देता येणार NDA ची परीक्षा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय गनींनी केला होता खुलासा देश सोडून गेल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनींनी आपल्या या निर्णयामागचा हेतू स्पष्ट केला होता. आपण देशात राहिलो, तर लाखो अफगाणी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आपण देश सोडण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या निर्णयावर देशातून आणि परदेशातूनही जोरदार टीका झाली होती. देशाला गरज असताना देशाचा प्रमुख नेताच पळून गेल्यामुळे त्यांच्या या कृतीला अनेकांनी भ्याडपणाची उपमा दिली होती.
First published:

Tags: Afghanistan, Taliban

पुढील बातम्या