मंगळग्रहावर पाणी सापडलंय!

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2015 10:00 PM IST

मंगळग्रहावर पाणी सापडलंय!

29 सप्टेंबर : मंगळग्रहावर पाणी सापडलंय! गेली अनेक दशकंच नाही तर कित्येक शतकं माणसाच्या खगोलशास्त्रीय तसंच पौराणिक चिंतनात महत्वाचं स्थान मिळवणार्‍या मंगळ ग्रहाविषयी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा'ने दिलीये.'नासा'च्या म्हणण्यानुसार मंगळ ग्रहावर उष्ण हवामान असणार्‍या काळात पाण्याचे ओहोळ वाहतात. हे ओहोळ मंगळ ग्रहावर शंभर मीटरहून जास्त अंतरावर वाहतात. कमी तापमानाच्या स्थितीत हे ओहोळ गोठतात.या नवीन शोधामुळे मंगळावर काही प्रमाणात जीवसृष्टी असण्याची शक्यताही 'नासा'ने वर्तवली आहे. आपल्या सूर्यमालेतला पृथ्वीशी सर्वात मिळताजुळता असणारा ग्रह आहे.सूर्यमालेतल्या 'हॅबिटेबल झोन' म्हणजे जीवसृष्टी निर्माण व्हायला पोषक स्थिती असणार्‍या झोनमध्ये पृथ्वीशिवाय असणारा हा एकमेव दुसरा ग्रह आहे. मंगळावर हे पाणी कुठुून येतं याचं स्पष्ट कारण आता माहीत नसलं तरी मंगळाच्या पृष्ठभागाच्या खाली असणार्‍या बर्फामुळे हे पाणी वर येऊ शकतं असा अंदाज आता व्यक्त होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2015 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...