सीरियाची माघार, रासायनिक अस्त्र समर्पण करणार

सीरियाची माघार, रासायनिक अस्त्र समर्पण करणार

  • Share this:

siriya410 सप्टेंबर : सीरियावर अमेरिका हल्ला करणार..युद्ध सुरू होणार..गेल्या महिन्याभरापासून उठलेलं हे युद्धाचं वादळ शमलं असल्याचं चित्र निर्माण झालंय. सीरियान समजदारीची भूमिका घेत रासायनिक अस्त्र समर्पण करण्याचं मान्य केलंय.

 

आपल्या रासायनिक शस्त्रांना आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली ठेवायचा रशियाचा प्रस्ताव आपल्याला मान्य आहे असं सीरियानं आज स्पष्ट केलं. या निर्णयाचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या प्रस्तावाचं स्वागत केलंय. सीरियानं हा प्रस्ताव मान्य केला तर ती सकारात्मक बाब असेल असं फ्रांस आणि जर्मनीनं म्हटलंय.

 

सीरियाने शस्त्र आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली आणल्यानंतर ती नष्ट करण्यात येईल. जर सीरियाने याचे उल्लंघन केले तर याचे विपरीत परिणाम सीरियाला भोगावे लागतील असं फ्रान्सचे विदेश मंत्री लॉरेंट फेबियस यांनी स्पष्ट केलं. या अगोदर अमेरिकेनंही सीरिया हाच सल्ला दिला होता. जर सीरियाने रासायनिक शस्त्र समर्पण केलं तर आम्ही हल्ला करणार नाही असं बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2013 11:07 PM IST

ताज्या बातम्या