शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकला पडलं महागात; भारतीय सैन्याने सर्वात मोठी कारवाई करीत दिला दणका

शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकला पडलं महागात; भारतीय सैन्याने सर्वात मोठी कारवाई करीत दिला दणका

गेल्या अनेक दिवसांपासून पाककडून वारंवार स्थानिक नागरिकांना लक्ष्य केलं जात होतं. दरम्यान भारतीय सैन्याने जोरदार हल्ला चढविण्याचे वृत्त समोर आले आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने (Indian Army) दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले आहे. भारतीय सैन्याने पीओकेतील (POK) दहशतवादी लॉन्चपॅड्सवर निशाणा साधला आहे. अद्याप लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पीओके मधील दहशतवादी अड्ड्यावर भारतीय सैन्य लक्ष्य करत असल्याची बातमी वृत्तसंस्था पीटीआयने दिली. यानंतर ही बातमी ट्विटरवर ट्रेंड झाली आहे

पीटीआयच्या रिपोर्टमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  कडाक्याच्या थंडीच्या भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी (Pakistan) सैन्याच्या हेतूला आळा घालण्यासाठी भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. 13 नोव्हेंबरच्या शस्त्रसंधीविरोधात ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. त्यादिवशीही भारतीय सैन्याने  अनेक पाकिस्तानी पोस्ट उडवल्याचे व्हिडिओ समोर आले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याने पीओकेमधील दहशतवाद्यांच्या तळांवर पिनपॉईंट स्ट्राईक केला आहे. जम्मू-काश्मीरला त्रास देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य कट रचत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. एफएटीएफची कारवाई टाळून पाकिस्तान अँटी टेरर वॉचडॉग दहशतवादाचे पूर्ण समर्थन करत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पाकिस्तानने कोणत्याही कारणास्तव निवासी भागात लक्ष्य केले आहे. प्रत्युत्तरात सैन्याने पाकिस्तानमधील अनेक सैन्याच्या चौक्याही उद्ध्वस्त केल्या आहेत.

हे ही वाचा-भारताचा पाकिस्तानविरुद्ध पुन्हा मोठा STRIKE : Pok मधले तळ उद्ध्वस्त

गेल्या आठवड्यात पाकिस्तानी लष्कराकडून अनेकवेळ शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय भागातील नागरिकांना लक्ष्य केलं गेलं आहे. वास्तविक पाहता यामागे भारतात घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 2019 मध्ये पाकिस्तानी गोळीबारात एकूण 19 निरपराध नागरिक ठार झाले होते, परंतु यावर्षी पाकिस्तानने मर्यादा ओलांडली आहे. यावर्षी आतापर्यंत पाकिस्तानी गोळीबारात 21 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सुरक्षा सूत्रांनी गुरुवारी सांगितलं की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये लाँचिंग पॅडला लक्ष्य केलं गेलं आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवणे, एफएटीएफ चौकशीपासून वाचण्यासाठी आणि एकाच वेळी दहशतवाद्याचं समर्थन करीत असताना चांगलं संतुलन साधण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे

सूत्रांनी सांगितलं की, गुप्तचरांच्या आधारे भारतीय लष्कराने पाकिस्तानी व परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ठरवून हल्ले केले आहेत. जम्मू-काश्मीरला अस्थिर करण्यासाठी आणि तरुणांना शस्त्र देण्यासाठी पाकिस्तानने नवीन पध्दत अवलंबली असल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तान जाणीवपूर्वक गावकऱ्यांना लक्ष्य करीत आहे. जेणेकरून काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवला जाईल.

Published by: Meenal Gangurde
First published: November 19, 2020, 8:16 PM IST

ताज्या बातम्या