बाप रे! या देशात चक्क लोकच आपल्या घराला लावतात आग, काय आहे नेमका प्रकार वाचा

बाप रे! या देशात चक्क लोकच आपल्या घराला लावतात आग, काय आहे नेमका प्रकार वाचा

युद्धामुळे हजारो लोकांना आपल्या घरातून पलायन करावं लागलं. मात्र घरातून निघण्यापूर्वी लोकांनी घरांना आगी लावल्याचं पाहायला मिळालं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : संपूर्ण जगाला कोरोनाचा (Coronavirus) विळखा असताना अजरबैजान (Azarbaijan) आणि आर्मेनियादरम्यान (Armenia) झालेल्या युद्धाने सर्व जगच हैराण आहे. आता समजूतीने आर्मेनियाने आपल्या विवादित क्षेत्र नागोर्नो-कराबाखला अजरबैजानला सोपवण्यास सहमती दर्शवली आहे. यापूर्वी शनिवारी नागोर्नो-कराबाखलामध्ये राहणाऱ्या लोकांनी आपली घरं खाली करण्यापूर्वी, घरांना आग लावली आहे.

आर्मेनियाई अलगाववादियोंद्वारा दशकांपासून नियंत्रित केल्या जाणाऱ्या अजरबैजानमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात पलायन केलं आहे. दोन देशांमध्ये झालेल्या संघर्षात 2317 हून अधिक मारले गेले. या आठवड्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युद्धात मरणाऱ्यांची संख्या 4000 हून अधिक असल्याचं सांगितलं. युद्धामुळे हजारो लोकांना आपल्या घरातून पलायन करावं लागलं. मात्र घरातून निघण्यापूर्वी लोकांनी घरांना आगी लावल्याचं पाहायला मिळालं. आपली घरं त्यांना मिळू नये यासाठी त्यांनी घरांना आग लावल्याची माहिती आहे.

दरम्यान, अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात 27 सप्टेंबरला युद्धाला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये भयंकर युद्ध झाले होतं. अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात तब्बल 29 दिवस सुरू असलेलं युद्ध अखेर संपलं आहे. दोन्ही देशांनी 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून युद्धबंदीची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शविली. अमेरिकेच्या पुढाकाराने आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्ध संपलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी याची घोषणा केली. दुसरीकडे रशियादेखील आपल्या भागात युद्ध नको म्हणून प्रयत्न करत होता. या युद्धात रशियन मध्यस्थीच्या माध्यमातून दोन युद्धविरामांचे प्रयत्न झाले, परंतु दोन्ही युद्धबंदी टिकली नाही आणि पुन्हा हा संघर्ष सुरू झाला होता.

Published by: Karishma Bhurke
First published: November 15, 2020, 2:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या