बाकू, 27 सप्टेंबर : अर्मेनिया (Armenia )आणि अझरबैजान (Azerbaijan ) यांच्यात सध्या युद्ध सुरू झाले आहे. सोव्हिएत रशियातून वेगळ्या झालेल्या या देशांमध्ये एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत. टॅंक, तोफ व लढाऊ हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. दरम्यान, अर्मेनियाने मार्शल लॉ देशात लागू केला असून आपल्या सैन्यास सीमेच्या दिशेने कूच करण्याचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूची नोंद दोन्ही देशांनी केली आहे.
अर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की अझरबैजान सैन्याने स्थानिक वेळेनुसार रात्री 08.10 वाजता प्रादेशिक राजधानी स्टेपनकुर्तच्या निवासी भागात हल्ला सुरू केला. प्रत्युत्तरादाखल आमच्या सुरक्षा दलाने दोन अझरबैजान हेलिकॉप्टर आणि तीन ड्रोन मारले आहेत. याशिवाय आम्ही तीन टॅंकही उडवले आहे. अर्मेनियाने टँकोला लक्ष्य करत एक व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे.
वाचा-मोठी बातमी! चीनमध्ये कोळशाच्या खाणीत 16 कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
Breaking: Video shows Azeri tanks/ troops getting destroyed by Armenian fire. pic.twitter.com/ElZDtzIjkh
— 301🇦🇲 (@301_AD) September 27, 2020
वाचा-मोदींचं UN मध्ये भाषण : 'भारताला निर्णय प्रक्रियेतून किती काळ दूर ठेवणार?'
दरम्यान अर्मेनियानं केलेल्या या हल्ल्याला उत्तर म्हणून अझरबैजानने म्हटले आहे की अर्मेनियाच्या सैन्य दलांच्या युद्ध कारवायांना दडपण्यासाठी आणि नागरी लोकसंख्येची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आमच्या सैन्याने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की अर्मेनियाच्या हल्ल्यात बऱ्याच निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. तर, एका हेलिकॉप्टरचा अपघातही झाला आहे.
वाचा-'संशोधन योग्य ठरल्यास डेंग्यूची लस ठरेल कोरोनावर प्रभावी', शास्त्रज्ञांचा दावा
या कारणामुळे दोन्ही देशात सुरू आहे युद्ध
दोन्ही देशांना 4400 चौरस किलोमीटर पसरलेल्या नागोर्नो-काराबाख नावाचा एक भाग ताब्यात घ्यायचा आहे. नागोर्नो-काराबाख प्रदेश हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अझरबैजानचा भाग आहे मात्र आर्मेनियाच्या काही गटांनी त्याचा ताबा घेतला आहे. 1991 मध्ये या भागातील लोकांनी अझरबैजानपासून स्वत: ला स्वतंत्र घोषित केले आणि स्वत: ला आर्मेनियाचा भाग म्हणून घोषित केले. अझरबैजानने ही कारवाई पूर्णपणे नाकारली आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले.