मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'जबरा फॅन'चा चुकीचा निर्णय; आवडत्या कलाकारासारखे दिसण्यासाठी तब्बल 30 वेळा प्लास्टिक सर्जरी, अन्...

'जबरा फॅन'चा चुकीचा निर्णय; आवडत्या कलाकारासारखे दिसण्यासाठी तब्बल 30 वेळा प्लास्टिक सर्जरी, अन्...

अर्जेंटिनामध्ये ( Argentina ) राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःला आवडत असणाऱ्या स्टार्ससारखा स्वतःचा चेहरा दिसावा, यासाठी तब्बल 30 वेळा चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली. यामध्ये त्याने लाखो रुपये खर्च केले. फ्रान्सिस्को मारियानो झेवियर इबानेझ ( Francisco Mariano Javier Ibanez ) असे या 33 वर्षीय युवकाचं नाव आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 27 डिसेंबर : अनेक कलाकार अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी ( plastic surgery ) करून घेत असतात. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या चेहऱ्यात खूप बदल ( face changes) होतो. पण एका व्यक्तीने त्याला आवडणाऱ्या कलाकारासारखं ( favorite artist ) दिसण्यासाठी तब्बल 30 वेळा चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली. त्यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केले. टीव्ही 9 हिंदी ने याबाबत वृत्त दिले आहे.

  जगात असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांची हेअरस्टाइल ( hairstyles ) आणि कपडे ( clothes ) लोकांना खूप आवडतात. अनेकजण त्यांची कॉपी करायला सुरुवात करतात. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा 'तेरे नाम' हा चित्रपट आला तेव्हा त्यातील सलमान खानची हेअरस्टाइल खूप लोकप्रिय झाली होती. गावागावात लोक त्या हेअरस्टाइलची कॉपी करू लागले होते. काही चाहते तर त्यांच्या आवडत्या स्टारसारखे दिसण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्याची सर्जरीदेखील करतात.असाच एक प्रकार सध्या चर्चेत आहे. अर्जेंटिनामध्ये ( Argentina ) राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःला आवडत असणाऱ्या स्टार्ससारखा स्वतःचा चेहरा दिसावा, यासाठी तब्बल 30 वेळा चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली. यामध्ये त्याने लाखो रुपये खर्च केले. फ्रान्सिस्को मारियानो झेवियर इबानेझ ( Francisco Mariano Javier Ibanez ) असे या 33 वर्षीय युवकाचं नाव आहे.

  फ्रान्सिस्कोने आतापर्यंत 30 वेळा त्याच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे. त्यासाठी त्याने 7 लाख रुपये खर्च केले आहेत. मात्र, आता स्वतःकडून चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आलं आहे. उलट आता तोच इतर लोकांना सल्ला देतो की, एखाद्या व्यक्तीने इतरांची कॉपी करण्याऐवजी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करावी. जेणेकरून लोक त्याला आयकॉन मानतील.

  Danger पठ्ठ्या..! दोन वर्षांचा हा चिमुरडा दररोज ओढायचा 40 सिगारेट, पण आता...

  नेमकी का केली सर्जरी ?

  जगप्रसिद्ध गीतकार आणि गायक रिकी मार्टिनसारखं दिसण्यासाठी फ्रान्सिस्कोने चेहऱ्यावर अनेक सर्जरी केल्या. 'तू रिकी मार्टिनसारखा दिसतोस,' असं त्याला अनेकजण सांगत होते. तेव्हापासून हुबेहूब मार्टिनसारखा दिसण्यासाठी तो चेहऱ्यावर सर्जरी करू लागला. त्याने जेव्हा पहिली सर्जरी केली, तेव्हा तो 12 वर्षांचा होता. मात्र, आता चेहऱ्यावर 30 सर्जरी करून लाखो रुपये खर्च केल्यानंतर त्याला स्वतःची चूक लक्षात आली आहे. तो कधीही रिकी मार्टिन होऊ शकत नाही हे त्याने मान्य केलं आहे.

  Kitchen Hacks: मऊ आणि टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवता येत नाहीत; मग या सोप्या टिप्स फॉलो करा

  चेहरा सुंदर दिसावा, यासाठी अनेकजण चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करतात. परंतु स्वतःच्या आवडत्या अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू, राजकीय व्यक्ती आदी क्षेत्रातील नामवंत व्यक्तीप्रमाणे स्वतःचा चेहरा दिसावा, यासाठी प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांचे प्रमाण तसे दुर्मिळच. असाच एक प्रकार अर्जेंटिनामध्ये घडला, व त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

  First published:

  Tags: Entertainment, Hollywood