Home /News /videsh /

2000 वर्षांपूर्वी पडला होता सोन्याच्या नाण्यांचा पाऊस? पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा दावा

2000 वर्षांपूर्वी पडला होता सोन्याच्या नाण्यांचा पाऊस? पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा दावा

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

Discovery of Golden Coins: मुख्य संशोधक हुर्कुट, म्हणाले की हा एक असाधारण शोध आहे जो तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच करू शकता. त्यांनी सुरुवातीला फक्त 10 नाणी शोधून काढली त्यानंतर पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमने 41 नाणी शोधून काढली.

    बर्लिन, 14 जानेवारी : जगात अशा अनेक अद्भुत गोष्टी आहेत, ज्याची माहिती आजही मानवाला नाही. अशी अनेक रहस्यं निसर्गाच्या पोटात दडली आहेत. कधी कधी मानवाला त्याचा शोध घेण्यात यश येतं आणि मानवासाठी ती एक अद्भुतरम्य पर्वणी ठरते. जर्मनीतल्या (Germany) पुरातत्त्वशास्त्रज्ञाला (Archeologist) लागलेल्या एका अभूतपूर्व शोधानं 2000 वर्षांपूर्वीचं रहस्य उलगडलं आहे. नवभारत टाइम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. ब्रँडनबर्ग स्टेट हेरिटेज मॅनेजमेंट अँड आर्किऑलॉजिकल स्टेट म्युझियममधले (BLDAAM) स्वयंसेवी पुरातत्त्वशास्त्रज्ञ वोल्फगँग हर्कट यांनी जर्मनीतल्या ब्रॅंडनबर्ग या राज्यात सेल्टिक नाण्यांचा (Seltic Coins) एक प्राचीन संग्रह शोधून काढला आहे. तो खजिना अमूल्य असून, ती 2000 वर्षांपूर्वीची नाणी आहेत. या खजिन्यात सोन्याची 41 नाणी आहेत. ब्रॅंडनबर्गमधला हा पहिला ज्ञात सेल्टिक सोन्याचा खजिना आहे. हा असाधारण शोध आहे आणि आयुष्यात फक्त एकदाच लागू शकतो, असं हर्कट यांनी म्हटलं आहे. ब्रॅंडनबर्गच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी डिसेंबर 2021 मध्ये हा खजिना सापडल्याची घोषणा केली होती. ब्रॅंडनबर्गमधल्या एका शेतात ही नाणी सापडल्याचं हर्कट यांनी सांगितलं. ही नाणी 2000 वर्षांपूर्वी तयार करण्यात आली असून, त्यांना (regenbogenschüsselchen) 'रेजेनबोगेनशुसेलशेन' म्हणजेच 'इंद्रधनुष्याचा कप' (Rainbow Cup) असं म्हटलं जातं. ही एखाद्या बशीसारखी थोडी खोलगट असतात, त्यावर विविध आकार, नक्षी असते. कारण या नाण्यांना असं नाव असण्यामागे एक अत्यंत अद्भुत कथा आहे. नाण्यांचा अभ्यास करणारे श्लोस फ्रिडेनस्टीन गोथा फाउंडेशनचे नाणकशास्त्रज्ञ आणि संशोधन सहायक मार्जान्को पायलिक यांनी 'लाइव्ह सायन्स'ला ही अनोखी कथा सांगितली. या नाण्यांचं नाव आणि आकार एका दंतकथेची आठवण करून देतात. या कथेनुसार, इंद्रधनुष्याच्या (Rainbow) शेवटच्या टोकाला एक भांडे असते. इंद्रधनुष्य पृथ्वीला जिथं टेकतं तिथं हे भांडं (Rainbow Pot) सापडतं. त्यात सोन्याची नाणी असतात. इंद्रधनुष्याच्या शेवटी असणारी ही भांडी थेट आकाशातून पडतात, असंही मानलं जातं. ही नाणी अत्यंत भाग्यकारी आणि काही आजारांवरच्या उपचारांसाठीही उपयुक्त मानली जात. पाऊस पडल्यानंतर शेतकर्‍यांना (Farmers) त्यांच्या शेतात अशी सोन्याची नाणी मिळाली असण्याची शक्यता आहे, असंही पायलिक यांनी सांगितलं. 10 नाणी सापडल्यानंतर पायलिक यांनी ब्रँडनबर्ग स्टेट हेरिटेज मॅनेजमेंट अँड आर्कियोलॉजिकल स्टेट म्युझियमला याची माहिती दिली. त्यानंतर पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी आणखी शोध घेतल्यानंतर त्यांना एकूण 41 नाणी सापडली. या खजिन्यामुळे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कोणती आणि कशी नाणी अस्तित्वात होती, याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे.
    First published:

    Tags: Gold

    पुढील बातम्या