बुरख्याशिवाय रंगतोय सौदीत महिलांचा पहिला फॅशन शो!

राजधानी रियाधमध्ये पहिल्या वहिल्या फॅशन वीकचे आयोजन करण्यात आलं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 13, 2018 05:54 PM IST

बुरख्याशिवाय रंगतोय सौदीत महिलांचा  पहिला  फॅशन शो!

13 एप्रिल: बुरख्याशिवाय ज्या देशातील महिलांना  रस्त्यावर चालताही येत नाही त्या देशातील महिला आता रॅम्पवॉक करणार आहेत.  आणि हा रॅम्पवॉक एक दोन दिवस नाही तर पूर्ण आठवाभर चालणार आहे. महिलांना लायन्स देणे, चित्रपटांवरची बंदी उठवणे यानंतर आता सौदी अरेबियाचे युवराज सलमान यांनी आता हे  क्रांतीकारी  पाऊल उचलले आहे. राजधानी रियाधमध्ये पहिल्या वहिल्या फॅशन वीकचे आयोजन करण्यात आलं आहे.

हा कार्यक्रम राजधानी रियाधमधील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार  आहे.    क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान या देशात अनेक  बदल घडवणार आहेत. याआधी त्यांनी स्त्रियांवरची गाडी चालवण्यास असलेली बंदी उठवली होती.  काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले केले आता आणखी एक पाऊल उचलून सलमान यांनी जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.

जगभरातील मोठे तसेच स्थानिक फॅशन ब्रँड आपलं कलेक्शन रॅम्पवर उतरवणार आहेत. कट्टर धार्मिक असलेल्या या देशानं एक पाऊल पुढे येऊन बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ,त्याचवेळी काही कडक नियमही घालण्यात आले आहे. या नियमांनुसार इथे छायाचित्रण करता येणार नाही. तसंच पुरूषांनाही  इथे जाण्यास बंदी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close