मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

गर्लफ्रेंडसोबतच्या रोमँटिक ट्रीपनं मेहुल चोक्सीला पोहोचवलं थेट तुरुंगात, अँटिग्वाच्या PM चा दावा

गर्लफ्रेंडसोबतच्या रोमँटिक ट्रीपनं मेहुल चोक्सीला पोहोचवलं थेट तुरुंगात, अँटिग्वाच्या PM चा दावा

भारतीय उद्योगपती मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला नुकतीच डोमिनिकामध्ये अटक झाली आहे. तो गर्लफ्रेंडला रोमँटिक सहलीसाठी डोमिनिकामध्ये (Dominica) घेऊन गेला असताना त्याला अटक झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली 31 मे : पंजाब नॅशनल बँक (PNB Scam) घोटाळ्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणा (India) शोध घेत असलेला भारतीय उद्योगपती मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला नुकतीच डोमिनिकामध्ये अटक झाली आहे. तो गर्लफ्रेंडला रोमँटिक सहलीसाठी डोमिनिकामध्ये (Dominica) घेऊन गेला असताना त्याला अटक झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एनडीटीव्हीने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. भारतीय तपास यंत्रणा शोध घेत असलेला मेहुल चोक्सी भारताचा नागरिक असून त्याच्याकडे अँटिग्वा (Antigua) या देशाचं नागरिकत्वही आहे. अँटिग्वा-बार्बुडामधून तो गायब झाला होता; मात्र त्याला नुकतीच डोमिनिकामधून अटक करण्यात आली. आता तिथून त्याचं भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी भारताकडून एक खासगी जेट विमानही पाठवण्यात आलं आहे, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे. भारतीय यंत्रणांपासून पळ काढत असलेला मेहुल चोक्सी मैत्रिणीला खास डिनरसाठी किंवा सहलीसाठी अँटिग्वातून शेजारच्या डोमिनिका या देशात घेऊन गेला होता. त्याने बेकायदेशीरपणे त्या देशात प्रवेश केल्याने तो तिथल्या यंत्रणांच्या हाती सापडला, अशी माहिती तिथल्या यंत्रणांकडून मिळत असल्याचं अँटिग्वा-बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टॉन ब्राउने (Gaston Browne) यांनी सांगितल्याचं वृत्त द ट्रिब्युनने प्रकाशित केलं आहे. झटापटीदरम्यान बालकनीमधून खाली कोसळले पती-पत्नी, थरारक VIDEO VIRAL अँटिग्वा न्यूजरूमने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान गॅस्टॉन ब्राउने म्हणाले, 'मेहुलने डॉमिनिका देशात बेकायदा प्रवेश केल्याने तो देश त्याचं थेट भारताला प्रत्यार्पण करू शकतो. त्याला पुन्हा अँटिग्वा-बार्बुडाच्या ताब्यात दिलं, तर इथले कायदेशीर हक्क त्याचा बचाव करू शकतात. या संदर्भात कोर्टाच्या निर्णयाचा पूर्णतः आदर केला जाईल.' 'आपण सध्या अशा जगात राहतो, की जिथे गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यासाठी सगळ्या देशांनी एकत्र, समन्वयाने काम करण्याची गरज आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला, कृतीला देशाच्या नागरिकत्वाच्या अधिकाराच्या आड गुन्हेगाराला संरक्षण मिळता कामा नये. म्हणूनच आम्ही डोमिनिका देशाला सांगत आहोत, की त्यांनी मेहुल चोक्सीचं थेट भारतात प्रत्यार्पण करावं. तो भारताचा अजूनही नागरिक आहे,' असं गॅस्टॉन ब्राउने यांनी सांगितलं. 'त्याचं भारताऐवजी अँटिग्वात प्रत्यार्पण (Deportation) झालं, तर त्याला अँटिग्वाचा नागरिक म्हणून असलेले कायदेशीर अधिकार मिळतील आणि संवैधानिक अधिकारांमुळे त्याचं संरक्षण होईल,' असंही गॅस्टॉन ब्राउने यांनी सांगितलं. सध्या मेहुल चोक्सी डोमिनिकाच्या तुरुंगात असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. तिथल्या तुरुंगातलं त्याचं छायाचित्र नुकतंच प्रसिद्ध झालं होतं.
First published:

Tags: Pnb, Pnb bank, Scam

पुढील बातम्या