Valentine दिवशी पोलिसांनी 24 अविवाहित जोडप्यांना पकडलं, जेलमध्ये दिलं SEXवर लेक्चर

Valentine दिवशी पोलिसांनी 24 अविवाहित जोडप्यांना पकडलं, जेलमध्ये दिलं SEXवर लेक्चर

व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. जगभरात 14 फेब्रुवारी रोजी जोडपी या प्रेमाचे सेलिब्रेशन करतात. मात्र दुसरीकडे अनेकांना प्रेम करण्यासाठी पोलीस कारवाईचा सामना करावा लागला.

  • Share this:

मकासार, 15 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. जगभरात 14 फेब्रुवारी रोजी जोडपी या प्रेमाचे सेलिब्रेशन करतात. मात्र दुसरीकडे अनेकांना प्रेम करण्यासाठी पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. मुस्लिमबहुल देश इंडोनेशियातील काही भागात पोलिसांनी हॉटेलांवर छापा टाकला आणि 24 अविवाहित जोडप्यांना अटक केली.

डेली मेलच्या वृत्तानुसार इंडोनेशियात उघडपणे प्रेम व्यक्त करण्यास बंदी घातली गेली असून देशाच्या संस्कृती आणि नैतिकतेच्या विरोधात विचार केला जातो. इंडोनेशियातील मकासार आणि डेपो येथील अधिकाऱ्यांना लोकांनी जाहीर प्रेम व्यक्त करू नये असा इशारा दिला.

वाचा-Red Lipstick चे विविध रंग; फक्त ओठ नव्हे, तर संपूर्ण चेहऱ्याचं खुलवते सौंदर्य

वाचा-मुलगी नोकरी करणारीच हवी; लग्न करताना मुलाची का असते अशी अट?

वाचा-या 7 रोमँटिक Kiss चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा इथे

त्यामुळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मकसरमध्ये पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून खोल्यांमध्ये अविवाहित जोडप्यांना अटक केली. यापैकी काही लोक पर्यटकही होते. पोलिसांनी अटक केलेल्या जोडप्याला 'लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवल्याचे नुकसान' या विषयावर भाषण देऊन सोडले. एवढेच नाही तर अटक केलेल्या या जोडप्यांपैकी पाच जणांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाचा-'व्हॅलेंटाइन डे' : रतन टाटांनी सांगितली त्यांची लव्ह स्टोरी, चीनमुळे तुटलं नातं

याआधी मकरमधील कंडोम विक्रीवरही अनेक प्रकारचे निर्बंध लावले आहेत. कंडोम खरेदीदारांचे वय काटेकोरपणे तपासले जाते. स्थानिक अधिकारी म्हणतात की कंडोम फक्त विवाहित प्रौढांसाठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 01:38 PM IST

ताज्या बातम्या