बापरे! अंटार्क्टिकाचं तापमान झालं मुंबईएवढं! आतापर्यंतची सर्वाधिक नोंद

अंटार्क्टिकाला ग्लोबल वॉर्मिंगचा चांगलाच तडाखा बसलाय. अर्जेंटिनाच्या एका संशोधन तळावरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, इथे 18.3 अंश सेल्सियसची नोंद झाली.

अंटार्क्टिकाला ग्लोबल वॉर्मिंगचा चांगलाच तडाखा बसलाय. अर्जेंटिनाच्या एका संशोधन तळावरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, इथे 18.3 अंश सेल्सियसची नोंद झाली.

  • Share this:
    मुंबई, 13 फेब्रुवारी : अंटार्क्टिकाला ग्लोबल वॉर्मिंगचा चांगलाच तडाखा बसलाय.अंटार्क्टिकामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. अर्जेंटिनाच्या एका संशोधन तळावरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, इथे 18.3 अंश सेल्सियसची नोंद झाली. याआधी इथे 0.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं होतं. अंटार्क्टिकाच्या उत्तर टोकावर इस्पेरान्झामध्ये मार्च 2015 मध्ये 17.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं होतं. अर्जेंटिनाच्या हवामानशास्त्र विभागाने ट्वीट करून ही माहिती दिली. या संशोधन तळावर 1961 पासूनची आकडेवारी आहे. त्याचाच आधार घेऊन तापमानाबद्दलची ही रेकॉर्ड ब्रेक माहिती देण्यात आलीय.

    (हेही वाचा : या अंडरवॉटर मेट्रोमध्ये करा अनोखी सफर, भारतातल्या पहिल्या प्रकल्पाचं आज उद्घाटन)

    अंटार्क्किटाच्या द्वीपसमूहाचा दक्षिण अमेरिकेच्या बाजूचा जो भाग आहे तिथे तापमान वेगाने वाढतं आहे. गेल्या 50 वर्षांत इथल्या तापमानात 3 अंश सेल्सियसची वाढ झालीय. या भागातल्या जवळपास सगळ्याच हिमनद्या वितळत चालल्या आहेत. संपूर्ण जगालाच हवामान बदल आणि तापमानवाढीचा फटका बसला आहे. (हेही वाचा : धक्कादायक! वायू प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू) अंटार्क्टिकामधल्या हिमनद्या वितळत असल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते अंटार्क्किटाचं वाढतं तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे.अशा पद्धतीने बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढत चाललं तर अंटार्क्किटावरचं बर्फ नाहिसं होण्याचा धोका आहे. ग्रीनलँडमध्येही तापमानवाढीमुळे बर्फ आक्रसत चाललं आहे. मुंबईमधली थंडी आता कमी झालीय पण हिवाळ्यामध्ये मुंबईचं तापमान खाली आली होतं.याच तापमानाची तुलना अंटार्क्टिकाच्या तापमानाशी केली जातेय. जागतिक तापमानवाढीबद्दल हा मोठा इशारा आहे. (हेही वाचा : जगातल्या या सगळ्यात श्रीमंत माणसाने गर्लफ्रेंडला दिलं 1200 कोटींचं गिफ्ट) =======================================================================================
    First published: