मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दिल्लीपेक्षाही मोठा हिमनग अंटार्कटिकापासून झाला वेगळा, शास्त्रज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

दिल्लीपेक्षाही मोठा हिमनग अंटार्कटिकापासून झाला वेगळा, शास्त्रज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

अंटार्कटिकामधील (Antarctica) बर्फाचा प्रचंड मोठा म्हणजे तब्बल सहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा हिमनग (Iceberg) तुटून दक्षिण जॉर्जियाच्या दिशेनं समुद्रात पुढे सरकत आहे. हा हिमनग इतका प्रचंड आकाराचा आहे की त्याचे आकारमान राजधानी दिल्लीच्या (Delhi) चौपट, तर अमेरिकेतील न्युयॉर्क (New York)शहराच्या सातपट मोठे आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 डिसेंबर : अंटार्कटिकामधील (Antarctica) बर्फाचा प्रचंड मोठा म्हणजे तब्बल सहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा हिमनग (Iceberg) तुटून दक्षिण जॉर्जियाच्या दिशेनं समुद्रात पुढे सरकत आहे. याच गतीनं हा हिमनग पुढे सरकत राहिला तर, समुद्रातील प्राण्यांना धोका निर्माण होण्याची तसंच जगाच्या पर्यावरणावर (Climate) मोठा परिणाम होण्याची चिंता शास्त्रज्ञांना वाटत आहे.

हा हिमनग इतका प्रचंड आकाराचा आहे की त्याचे आकारमान राजधानी दिल्लीच्या (Delhi) चौपट, तर अमेरिकेतील न्युयॉर्क (New York)शहराच्या सातपट मोठे आहे.

हिमाच्छादित भागात हिमकडे, हिमनग तुटण्याची घटना सामान्य असते, ती वारंवार घडत असते; पण अंटार्क्टिकामधील हिमनग वेगळे होणं हा देखील पर्यावरण बदलाचा (Climate Change) परिणाम आहे, असं अनेक शास्त्रज्ञांचं मानणं आहे. ब्रिटिश अंटार्कटिक सर्व्हे (British Antarctic Survey -BAS) या संस्थेच्या मते, मात्र ही नैसर्गिक घटना असून, याचा पर्यावरण बदलाशी विशेष संबंध नाही.

हा हिमनग महासागरातील लाटांबरोबर पुढे पुढे सरकत असून, समुद्रात होणाऱ्या वादळांमुळे त्याचे छोटे छोटे तुकडेही होत आहेत. अंटार्क्टिकामधील सहा हजार चौरस फुटाच्या मूळ हिमनगाला शास्त्रज्ञांनी ए-68 असं नाव दिलं असून त्यापासून वेगळे झालेल्या अडीच हजार चौरस फुटाच्या म्हणजे दिल्लीपेक्षा दुप्पट आकाराच्या एका तुकड्याला ‘ए-68ए’ (A68a) असं नाव देण्यात आलं आहे. हा हिमनग एखाद्या उथळ जागी थांबला तर तिथल्या जलचर सृष्टीचा विनाश ठरलेला आहे. हा हिमनग एखाद्या बेटाजवळ थांबला तर तिथले प्राणी, वनस्पती नष्ट होतील, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

पेंग्विन, सील यासारखे प्राणी हे खाद्याच्या शोधात समुद्रात खूप दूरवर जात असतात, ते या हिमनगामुळे रस्ता चुकतील आणि पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परत येऊ शकणार नाहीत. यामुळे खाद्य कमी पडल्यानं या प्राण्यांच्या पिल्लांचा मृत्यूही होऊ शकतो, अशी चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. तसंच या हिमनगाच्या वितळण्यामुळे जगभरातील महासागरांची (Sea Level) पाणी पातळी किमान दहा सेंटीमीटरनं वाढण्याचाही धोका आहे.

या हिमनगाचे छोटे छोटे तुकडे समुद्रात खाली गेल्याने वरून दिसू शकणार नाहीत, त्यामुळे समुद्रातून प्रवास करणाऱ्या जहाजांचेही अपघात होऊ शकतात. हिमनगाला धडकल्यामुळे जहाजांना जलसमाधी मिळाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यावरूनच ‘टीप ऑफ द आईसबर्ग’ (Tip of the Iceberg) ही म्हण पडली आहे.

या घडामोडीचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होणार आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने अंदमान-निकोबारमधील (Andman -Nicobar)अनेक बेटं पाण्याखाली जाऊ शकतात. बंगालच्या खाडीतील सुंदरबनही नष्ट होऊ शकतं. अर्थात ही अतिशय प्रदीर्घ कालीन प्रक्रिया आहे.

या दुष्परिणामांबाबत सावधगिरीचा इशारा देतानाच एका सकारात्मक परिणामाकडेही शास्त्रज्ञांनी लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे, या हिमनगाबरोबर माती, धूळही असेल, ती समुद्रातील लाटांबरोबर तरंगणाऱ्या प्लँक्टन (Plankton)म्हणून ओळखले जाणारे छोटे जीवजंतू आणि वनस्पतींचं खाद्यात रुपांतर करेल. या प्रक्रियेत वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड (Co2)शोषला जाईल, परिणामी वायू प्रदूषण (Air Pollution)कमी होण्यास मदत होईल, असं शास्त्रज्ञांनी नमूद केलं आहे.

First published: