चीनमध्येच आढळला आणखी एक नवा विषाणू; Monkey B Virus मुळे एका पशुवैद्यकाचा मृत्यू

Monkey B Virus या संसर्गामुळे चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) एका पशुवैद्यकाचा (Veterinary Doctor) मृत्यू झाला आहे. माकडांमधून माणसात हा संसर्ग पसरल्याचं, तसंच त्यामुळे मृत्यू झाल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.

Monkey B Virus या संसर्गामुळे चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) एका पशुवैद्यकाचा (Veterinary Doctor) मृत्यू झाला आहे. माकडांमधून माणसात हा संसर्ग पसरल्याचं, तसंच त्यामुळे मृत्यू झाल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 22 जुलै: माणसाचा वेगवेगळ्या प्राण्यांशी येत असलेला संपर्क आणि गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता इथून पुढच्या काळात प्राण्यांमधून माणसांमध्ये येणाऱ्या संसर्गांचं प्रमाण जास्त असेल, असा इशारा जगभरातल्या अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. तशी काही उदाहरणंही दिसू लागली आहेत. वटवाघळांमधून माणसात आलेल्या आणि चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गाने गेलं दीड वर्ष धुमाकूळ घातला आहे. तो जरा कुठे ओसरतोय तोपर्यंत चीनमधूनच आणखी एका प्राणिजन्य विषाणू संसर्गाचं वृत्त आलं आहे. मंकी बी व्हायरस (Monkey B Virus) असं त्या विषाणूचं नाव असून, तो माकडांमधून (Monkey) माणसांत पसरतो. या संसर्गामुळे चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) एका पशुवैद्यकाचा (Veterinary Doctor) मृत्यू झाला आहे. माकडांमधून माणसात हा संसर्ग पसरल्याचं, तसंच त्यामुळे मृत्यू झाल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. 'ग्लोबल टाइम्स'च्या हवाल्याने 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMRचे माजी सल्लागार डॉ. व्ही. के. भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्पीस बी व्हायरस म्हणजेच मंकी बी व्हायरस प्रौढ मॅकॉक (Macaque) माकडांद्वारे पसरतो. रीसस मॅकॉक, छोट्या शेपटीची मॅकॉक आणि मोठ्या शेपटीची मॅकॉक, सिनोमोलॉगस या सगळ्या प्रकारच्या माकडांपासूनही हा विषाणू पसरू शकतो. हा विषाणू अद्याप भारतातल्या माकडांमध्ये आढळला नसल्याचंही डॉ. भारद्वाज यांनी स्पष्ट केलं. माणसांमध्ये याचा संसर्ग (Infection) होणं अगदी सहज शक्य नाही, मात्र संसर्गग्रस्त मॅकॉक माकडांच्या संपर्कात माणसं आली, तर माणसांत संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही. माणसांत संसर्ग झालाच, तर मेंदूशी संबंधित आरोग्य समस्या उद्धवू शकतात, असं डॉ. भारद्वाज म्हणतात. मंकी बी व्हायरसमुळे मृत्यू झालेला बीजिंगमधला पशुवैद्यक 53 वर्षांचा होता. तो नॉन ह्यूमन प्रायमेट्स (Non Human Primates) प्राण्यांवर संशोधन करत होता. मार्च 2021 मध्ये त्याने दोन मृत माकडांवर संशोधन केलं होतं. त्यानंतर त्याला उलट्या, मळमळ आदी लक्षणं दिसू लागली होती. अनेक हॉस्पिटल्समध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले, मात्र अखेर 27 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्ती मात्र आतापर्यंत तरी पूर्णतः ठणठणीत आहेत.

ड्रोनद्वारे या देशात पाडला कृत्रिम पाऊस, 50 डिग्री तापमानात नागरिकांना दिलासा

या विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त झालेल्या व्यक्तींना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर तब्बल 70 टक्के जणांचा मृत्यू होऊ शकतो, बोस्टन पब्लिक हेल्थ कमिशनच्या अहवालात असं म्हटलं आहे. त्यामुळे माकडांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. माकड चावलं किंवा त्याने नखं लावली आणि ते माकड मंकी बी व्हायरसचा वाहक असेल, तर संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. अशी जखम झाल्यास तातडीने साबण आणि पाण्याने धुवायला हवी. मंकी बी व्हायरसवर अँटीव्हायरल औषधं (Antiviral Drugs) उपलब्ध आहेत, मात्र आतापर्यंत यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. माकडांची लाळ, मल-मूत्र, माकड चावणं, नखं लावणं आदींमुळे हा विषाणू माणसांत येऊ शकतो. व्हायरॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, पशुवैद्यक, तसंच माकडांच्या सान्निध्यात राहणाऱ्या व्यक्ती आदींना या संसर्गाचा धोका असू शकतो. संसर्गाची लक्षणं तीन ते सात दिवसांत किंवा जास्तीत जास्त महिन्याच्या आत दिसतात, असं डॉ. भारद्वाज सांगतात.

चीनमध्ये चार दिवसात पडला वर्षभराचा पाऊस, एका तासात कहऱ, पाहा Video

खाज, स्नायू आखडणं, जखम दुखणं, ताप, थंडी वाजणं, उलट्या, 24 तासांहून अधिक काळ डोकेदुखी, थकवा अशा प्रकारची लक्षणं यात दिसू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणं वेगवेगळी असू शकतात, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीत पाहता संसर्गाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
First published: