संयुक्त राष्ट्रसंघातील महत्त्वाच्या पदावर आणखी एका भारतीय महिलेची वर्णी; कोण आहेत लिगिया नोरोन्हा?

संयुक्त राष्ट्रसंघातील महत्त्वाच्या पदावर आणखी एका भारतीय महिलेची वर्णी; कोण आहेत लिगिया नोरोन्हा?

संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नॉरोन्हा ( Ligia Noronha) यांची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)च्या सहाय्यक सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. जाणून घ्या त्यांच्याबद्दल...

  • Share this:

न्युयॉर्क, 26 फेब्रुवारी: अलीकडेच अमेरिकेच्या बायडेन प्रशासनात अनेक भारतीय वंशाच्या महिलांची वर्णी लागली आहे. आता भारतीयांच्या अभिमानात आणखी भर घालणारी घटना समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे (United nations) प्रमुख अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नॉरोन्हा ( Ligia Noronha) यांची संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) च्या सहाय्यक सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता लिगिया नोरोन्हा आपला भारतीय सहकारी आणि अर्थशास्त्रज्ञ सत्या त्रिपाठी (Satya Tripathi) यांची जागा घेणार आहेत.

गुरुवारी एक निवेदन जारी करत संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी त्रिपाठी यांच्या कार्याचं कौतुकं केलं आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वात केलेल्या महत्त्वपूर्ण कामांचं आभारही मानलं आहे. नोरोन्हा यांची एवढ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे भारतातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

लिगिया नोरोन्हा ह्या एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी शाश्वत विकासात भरीव कामगिरी केली आहे. तसेच त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा 30 वर्षांचा तगडा अनुभव आहे. त्यांनी 2014 पासून नैरोबी येथून UNEP च्या आर्थिक विभागात संचालिक म्हणून काम पाहिलं आहे. UNEP मध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी नवी दिल्लीतील 'द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी) मध्ये कार्यकारी संचालिक म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांनी संसाधन, नियमन आणि ग्लोबल सिक्युरिटी सेक्शनच्या संचालिका म्हणूनही काम पाहिलं आहे.

हे ही वाचा -जो बायडेन In Action : अमेरिकेचा सीरियामध्ये Air Strike, ‘या’ ठिकाणांना केलं लक्ष

यूएनच्या संस्थांमध्ये भारतीय महिलांची संख्या वाढली

अलीकडच्या काही काळात यूएनमधील विविध एजन्सींमध्ये भारतीय महिलांची संख्या वाढत चालली आहे. गेल्याच आठवड्यात गुटेरेस यांनी गुंतवणूकविषयक तज्ज्ञ असणाऱ्या उषा राव मोनारी यांची संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.

Published by: News18 Desk
First published: February 26, 2021, 11:11 PM IST

ताज्या बातम्या