S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अॅंजेला मर्केल जर्मनीच्या निवडणुकांमध्ये विजयी;व्होट शेअर मात्र घसरला

मर्केल जिकंल्या जरी असल्या तरी त्यांचा व्होट शेअर प्रचंड कमी झाला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 11:59 AM IST

अॅंजेला मर्केल जर्मनीच्या निवडणुकांमध्ये विजयी;व्होट शेअर मात्र घसरला

25 सप्टेंबर: अॅंजेला मर्केल चौथ्यांदा जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आहेत. मर्केल जिकंल्या जरी असल्या तरी त्यांचा व्होट शेअर प्रचंड कमी झाला आहे.त्यांना 2013 साली 41टक्के मतं मिळाली होती तर यावर्षी 33 टक्के मतं मिळाली आहे

मर्केल यांचा ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाला सर्वाधिक मतं मिळाली आहे. त्यांचे प्रमुख विरोधी असणाऱ्या सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाला फक्त 20 टक्के मत मिळाली.तर पहिल्यांदाच उजव्या विचारांच्या ए एफडी पक्षाला जर्मनीच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेत स्थान मिळवण्यात यश मिळालं आहे.

जर्मनीत रविवारी संसदेचे (बुंडेस्टाग) प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान झालेय मर्केल यांनी स्थैर्य व विकास या मुद्दयांवर निवडणूक लढवली होती. ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर (ब्रेक्झिट) युरोपच्या मुक्त व संयुक्त बाजारपेठेचे भवितव्य, जागतिक मंदीच्या काळात जर्मनीची प्रगती कायम ठेवणे, सीरियामधील निर्वासितांच्या येण्याने निर्माण झालेल्या सामाजिक तणावाला तोंड देणे असे मुद्दे या निवडणुकीत महत्त्वाचे बनले होते.तसंच समलैंगिक विवाहांना मान्यता देणे हा त्यांनी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 09:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close