पाहा VIDEO : रागावलेल्या बकऱ्याने BBC च्या कॅमेरामनवर केला हल्ला

पाहा VIDEO : रागावलेल्या बकऱ्याने BBC च्या कॅमेरामनवर केला हल्ला

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका संतापलेल्या बकऱ्याचा आहे. या बकऱ्याने BBC च्या कॅमेरामनला ढुश्या दिल्या आणि त्याला खाली पाडलं.

  • Share this:

मुंबई, 6 सप्टेंबर : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका संतापलेल्या बकऱ्याचा आहे. या बकऱ्याने BBC च्या कॅमेरामनला ढुश्या दिल्या आणि त्याला खाली पाडलं. विल्टशायरमधल्या अॅनिमल पार्कमध्ये BBC ची टीम शूटिंग करत होती. त्यावेळी सेसिल नावाच्या या बकऱ्याने कॅमेरामनवर हल्ला चढवला. हा बकरा आफ्रिकेतल्या कॅमेरून वंशाचा आहे. हे बकरे दुर्मिळ वंशाचे आहेत. शूटिंग सुरू असताना हा बकरा आला आणि टीममधल्या काहीजणांशी खेळू लागला.कॅमेरामन जेव्हा त्याचं शूटिंग करू लागला तेव्हा तो संतापला आणि त्याने त्याच्यावर हल्ला केला.

बकऱ्याच्या या हल्ल्यात कॅमेरामन जखमी झाला. त्यावर या बकऱ्याच्या कीपरने त्याला दटावलं.हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला 8 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. काहीजणांनी या कॅमेरामनने बकऱ्याच्या तावडीतून कॅमेरा वाचवल्याबद्दल त्याचं कौतुक केलं. काहीजणांनी मात्र यावर मजेशीर कॉमेंटही केल्या. हा व्हिडिओ पाहण्यासाठी मी पैसे द्यायला तयार आहे, असं एकाने लिहिलं. या व्हिडिओमुळे मी खूप हसलो, असंही एकाने लिहिलं आहे.

हेही वाचा : या नेत्याकडे सोपवली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

=====================================================================================================

SPECIAL REPORT : शिवकालीन गडकिल्ल्यांचं हॉटेल्समध्ये रुपांतर खरंच होणार का?

First published: September 6, 2019, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading