...आणि खोकल्यातून रक्त आलं, पाकिस्तानी कोरोनाबाधित व्यक्तीचा अंगावर शहारे आणणारा FB LIVE VIDEO

...आणि खोकल्यातून रक्त आलं, पाकिस्तानी कोरोनाबाधित व्यक्तीचा अंगावर शहारे आणणारा FB LIVE VIDEO

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं हे त्यांना मागील आठवड्यातील शुक्रवारी जाणवायला लागली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मार्च : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसमुळे अवघं जग आता वेठीला धरलं आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देश ठप्प झाले आहे. तर अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. कोरोना व्हायरसची तीव्रता किती भयंकर आहे, याबद्दल एका बाधित रुग्णाने आपला अनुभव फेसबुकवर व्हिडिओ लाईव्ह करून सांगितला आहे.

मलिक मुबाशीर हसन (Malik Mubashir Hassan) असं या व्यक्तीचं नाव आहे. मलिक हसन हे पाकिस्तानातील रहिवासी आहे. हसन हे कामानिमित्त फ्रान्समध्ये राहतात. फ्रान्समधील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ते काम करतात. या कंपनीचे ऑफिस हे एका 40 मजल्याच्या टॉवरमध्ये आहे. मागील आठवड्यात कोरोना व्हायरसमुळे बाधित झाल्यामुळे फ्रान्समधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं हे त्यांना मागील आठवड्यातील शुक्रवारी जाणवायला लागली होती. अचानक सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखी सुरू झाली. त्यानंतर त्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचार घेतला. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यांना घरीच राहण्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आधी याची तीव्रता कमी होती, त्यामुळे त्यांनीही घरी राहणं योग्य समजलं. त्यानंतर काही दिवसांनी अचानक रात्री तब्येत खालावली. खोकला प्रचंड वाढला होता. तापाचे प्रमाणही खूप जास्त झालं होतं. एवढंच नाहीतर खोकत असता ना रक्तही बाहेर पडलं. मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली. त्यानंतर हसन यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हसन यांची प्रकृती आता स्थिर आहे.

पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहे. हसन यांनी आपल्या देशातील नागरिकांना कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या घराची स्वच्छता ही स्वत:च करा. जर तुमच्या घरात काम करणारा नोकरवर्ग असले तर त्यांना सुट्टी देऊन टाका, कारण ते एका घरातून काम करून आपल्या घरात येत असतात. त्यामुळे त्यांना सुट्टी देऊन टाका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तसंच, तुमच्या परिसरात जर कोरोना बाधित रुग्ण आढळले असतील तर घरातच राहा. अत्यंत गरजेचं काम असेल, जसं फळं, भाजीपाला आण्याचे असतील तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा घरातून बाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंतीही हसन यांनी केली. पाकिस्तानामध्ये जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा गळाभेट घेऊन एकमेकांचं स्वागत करत असतात, त्यामुळे कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत हे करणे पूर्णपणे टाळावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

First published: March 18, 2020, 6:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या