मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तब्बल 2 हजार वर्षे बंद असणारं पुरातन शहर पर्यटनासाठी होणार खुलं; जाणून घ्या त्यामागील इतिहास

तब्बल 2 हजार वर्षे बंद असणारं पुरातन शहर पर्यटनासाठी होणार खुलं; जाणून घ्या त्यामागील इतिहास

या शहरात जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे या शहरात 111 कबरी आहेत आणि त्यावर त्यांना हात लावू नये अशा सूचना लिहिल्या आहेत.

या शहरात जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे या शहरात 111 कबरी आहेत आणि त्यावर त्यांना हात लावू नये अशा सूचना लिहिल्या आहेत.

या शहरात जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे या शहरात 111 कबरी आहेत आणि त्यावर त्यांना हात लावू नये अशा सूचना लिहिल्या आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

सौदी अरेबिया, 30 नोव्हेंबर : येथील तब्बल दोन हजार वर्षे जुने असणारे हेग्रा शहर आता पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. जॉर्डनजवळ असलेल्या हेग्रा या शहरात जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे या शहरात 111 कबरी आहेत आणि त्यावर त्यांना हात लावू नये अशा सूचना लिहिल्या आहेत.

कोरोनामुळे (Coronavirus) सध्या अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. कोरोनाची लस आल्यानंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक देश तयारी करत आहेत. त्यापैकी एक आहे, सौदी अरेबिया. पर्यटनाला चालना देण्यासाठी सौदी अरेबियाने हेग्रा हे पुरातन शहर जनतेसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे. कबरींचे शहर म्हणून हे शहर ओळखले जाते. या शहराचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. पेट्राशी जोडलेल्या या शहरात इसवी सन पूर्व चौथ्या शतकात अरबांचा नाबटियास हा भटका समाज रहात होता. हे लोक मसाल्यांचा व्यापार करत होते.

त्यांनी वाळवंटी प्रदेशात हे अतिशय समृद्ध शहर वसवले. पहिल्या इसवी सनात या शहरावर रोमन शासकांनी हल्ला केला, त्यात अरबांची वसाहत जवळपास नष्ट झाली. इथे रोमन संस्कृती नांदू लागली. अजूनही हेग्रामधील कबरींवर रोमन संस्कृतीची छाप दिसते. या शहराला पूर्वी मादाईन सालेह नावानेही ओळखले जात होते. व्यापाराचे केंद्र असणारे हे शहर रोमन साम्राज्याच्या काळातही व्यापारात आघाडीवर होते पण नंतर हळूहळू व्यापाराची केंद्रे बदलत गेली आणि हेग्रा मागे पडले. आजही हे शहर संपूर्णपणे का उद्ध्वस्त झालं; या शहरातील लोक कुठे गेले याचा शोध लागलेला नाही. आता या वाळवंटात 111 कबरी आहेत. यावर अरबी भाषेत या कबरींना हात लावणारे किंवा त्यांची तोडमोड करणारे यांना क्षमा नाही, अशी सूचना लिहिली आहे.

हे ही वाचा- तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार CORONA VACCINE? एका क्लिकवर पाहा मोदी सरकारचा प्लॅन

युनेस्कोने या शहराचा समावेश जागतिक वारसा यादीत केला आहे. हजारो वर्षापूर्वी इथं नाबाटीयांस ही जमात रहात होती. या ठिकाणी कबरींशिवाय अनेक नक्षीदार गोष्टींचे अवशेष आहेत.त्या काळातील सांस्कृतिक समृद्धीची साक्ष त्या देतात. हा वाळवंटी प्रदेश असून देखील इथं विहिरींसारख्या रचना आढळतात. मध्ययुगीन काळात हे शहर आणि इथली संस्कृती नष्ट झाली मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या शहराचा पुन्हा उपयोग करण्यात आला. ऑटोमन साम्राज्यातील राजाने इथं किल्ला बनवला. आता तब्बल दोन हजार वर्षांनंतर हे शहर पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहमद बिन सलमान यांचा हा निर्णय असून, 2016 मध्येच त्यांनी पर्यटनाला चालना देण्याची घोषणा केली होती. सौदी व्हिजन 2030 अंतर्गत सौदीला केवळ पर्यटनाचेच नव्हे तर व्यापाराचेही मोठे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार, अरब आणि आशियाई देशांशिवाय युरोप आणि आफ्रिकन देशांशीही सौदी अरेबिया जोडला जाईल, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठीच हेग्रा शहरही खोलण्यात येत आहे. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेले हे शहर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

हे ही वाचा-बड्या नेत्यांनी कोरोनाविरोधात युद्ध जिंकलं; POST COVID COMPLICATION ने घेतला जीव

एक विशेष बाब म्हणजे, जॉर्डनचे हे शहर आणखी एक असेच रहस्यमय पुरातन शहर पेट्राचे जुळे शहर आहे. पेट्राही व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. रेशीम आणि मसाल्यांच्या व्यापारासाठीच्या मार्गांवरील हे मध्यवर्ती ठाणे होते. इसवी सन 363 मध्ये आलेल्या भूकंपाने हे जवळपास अर्धे शहर उद्ध्वस्त झाले. व्यापारी केंद्र असल्याने यावर अनेक आक्रमणेही झाली आणि हे शहरदेखील कालानुरूप विस्मरणात गेले. 1812 मध्ये स्वीस संशोधक जोहान लुडविग बर्कहार्ट याने हे शहर शोधून काढले. युनेस्कोने 1985 मध्ये याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले. डोंगराळ प्रदेशात वसलेले हे शहर म्हणजे एक आश्चर्यच आहे. इथे डोंगरांमध्येच घरे, मंदिरे आहेत. त्याचबरोबर शेकडो कबरी आहेत. या जमीनदोस्त झालेल्या शहराचा अर्ध्याहूनही कमी भाग उजेडात आला आहे, असे मानले जाते.

First published: