S M L

फ्लोरिडाच्या शाळेत माजी विद्यार्थ्यानेच केला गोळीबार; 17 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील फ्लोरिडा भागात असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार झाला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 15, 2018 08:08 AM IST

फ्लोरिडाच्या शाळेत माजी विद्यार्थ्यानेच केला गोळीबार; 17 जणांचा मृत्यू

15 फेब्रुवारी : अमेरिकेतील फ्लोरिडा भागात असलेल्या पार्कलॅन्डमधील एका शाळेत गोळीबार झाला आहे. फ्लोरिडामधील पार्कलॅन्ड इथल्या स्टोनमॅन डगलस या शाळेत अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला असून यात 20 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता गोळीबार करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. निकोलस क्रुज असं या हल्लेखोराचं नाव आहे. हा शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापनानं शिस्तभंगाची कारवाई केली करत याला शाळेतून काढण्यात आलं होतं. असंही सांगण्यात येतं आहे.

सूत्रांनुसार, निकोलस याने शाळेत येऊन फायर अलर्ट वाजवला आणि अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. या दरम्यान अनेक विद्यार्थी वर्गात लपून बसले होते. पोलिसांच्या ताफ्यानं शाळा इमारतीला घेरून निकोलसला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या या गोळीबारामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान या सगळ्या प्रकारावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी या घटनेचा निषेध करत आणि मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं आहे. आणि त्यांना मदत करण्याचंही आश्वासन दिले आहे.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 07:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close