Home /News /videsh /

मोठी बातमी! चीनसोबतच्या तणावादरम्यान भारताने रशियासोबत केला मोठा करार

मोठी बातमी! चीनसोबतच्या तणावादरम्यान भारताने रशियासोबत केला मोठा करार

चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान हा अत्यंत महत्त्वाचा करार मानला जात आहे.

    मास्को, 3 सप्टेंबर : भारत आणि चीन (India China Rift) दरम्यान लडाखच्या सीमेवर (Ladakh Border) सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताने (India) रशियासोबत (Russia) एक मोठा करार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मॉस्को (Moscow) च्या यात्रादरम्यान भारत आणि रशियाने अत्याधुनिक एके-203 रायफल (AK-203 Rifles) भारतात तयार करण्याबाबत एक मोठा करार केला आहे.  आधिकारिक रशियाच्या मीडियानुसार गुरुवारी ही माहिती देण्यात आली. एके-203 रायफल, एके-47 रायफल (AK-47 Rifles) चा नवीनतम आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे.  ही ‘इंडियन स्मॉल ऑर्म्स सिस्टम’(India Small Arms System) (इनसास) 5.56x45 मिमी रायफलची जागा घेईल. रशियाच्या सरकारी वृत्त एजंसी स्पुतनिक (Sputnik) नुसार भारतीय थल सेनेला (Indian Army) तब्बल 770,000 एके-203 रायफलची गरज आहे, ज्यामध्ये 1 लाखांची आयात केली जाईल आणि उरलेल्यांची निर्मिती भारतात केली जाईल. रशियाच्या वृत्त एजेंसीच्या बातमीनुसार या रायफल्सना भारतात संयुक्त उद्यम भारत-रशिया रायफल प्राइवेट लिमिटेड (आईआरआरपीएल) अंतर्गत तयार करण्यात येईल. याची स्थापना आयुध निर्माणी बोर्ड (ओएफबी) आणि कलाशनीकोव (Kalashnikov) कंसर्न वा रोसोबोरेनेक्सपोर्ट (Rosoboronexport) यांच्यामध्ये झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियातील SCO च्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी झाले होते. यामध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरक्षेबाबत मदत वाढविण्यासाठी रशियासोबत द्विपक्षीय बैठक घेण्यात आली होती.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Russia

    पुढील बातम्या