मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोना लस मृत्यूपासून वाचवते कां? ‘या’ घटनेमुळं प्रभावावर प्रश्नचिन्ह; नवा वाद सुरू

कोरोना लस मृत्यूपासून वाचवते कां? ‘या’ घटनेमुळं प्रभावावर प्रश्नचिन्ह; नवा वाद सुरू

Corona vaccination effect: खरं तर कोरोना लसीकरण झालेल्या फक्त 0.2 टक्के व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पण अमेरिकेतल्या हाय प्रोफाइल मृत्यूमुळे लशीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

Corona vaccination effect: खरं तर कोरोना लसीकरण झालेल्या फक्त 0.2 टक्के व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पण अमेरिकेतल्या हाय प्रोफाइल मृत्यूमुळे लशीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

Corona vaccination effect: खरं तर कोरोना लसीकरण झालेल्या फक्त 0.2 टक्के व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पण अमेरिकेतल्या हाय प्रोफाइल मृत्यूमुळे लशीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

न्यूयॉर्क, 22 ऑक्टोबर :  रशियात कोरोना लसीकरण चांगल्या प्रमाणात झालं असतानादेखील कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा (Coronavirus cases in Russia) वेग वाढतो आहे. अमेरिकेतही कोरोना अद्याप संपलेला नाही.  अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय माजी परराष्ट्र मंत्री कॉलिन पॉवेल (Colin Powell) यांचं सोमवारी निधन झालं. कोरोनाशी (Corona) संबंधित गुंतागुंती त्यांच्या मृत्यूचं कारण ठरल्या. विशेष म्हणजे पॉवेल यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे (Vaccine) दोन्ही डोस घेतले होते. अशा परिस्थितीत, त्यांच्या मृत्यूमुळे लसीच्या परिणामाविषयी नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. शास्त्रज्ञांनी यामागे अन्य कारणंही असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. याशिवाय ब्रेक थ्रू (Break Through) म्हणजेच कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेऊनही मृत्यूचं प्रमाण केवळ 0.2 ते 6 टक्के असल्याचं आकडेवारीवरून दिसतं. `न्यूयॉर्क टाइम्स`ने दिलेल्या वृत्तानुसार, मल्टिपल मायलोमा (Multiple Myeloma) म्हणजेच पांढऱ्या पेशींच्या कर्करोगामुळे (Cancer) पॉवेल यांची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) कमकुवत झाली होती, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 100 कोटींचा टप्पा पार, पुढे काय? लसीकरणाचा रथ ओढणाऱ्या सारथ्यांनी सांगितली योजना हे दोन्ही आजार आणि त्यावरील उपचार रुग्णांतील संसर्गाची शक्यता वाढवतात. पॉवेल यांचं वय 84 वर्ष होतं, त्यामुळे कदाचित जोखीम वाढल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं. पॉवेल यांच्या निधनानंतर कोरोना प्रतिबंधक लसीवरील विश्वास कमी होऊ नये, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. लसीमुळे कोरोनाच्या गंभीर केसेस आणि मृत्यूमध्ये लक्षणीय घट झाली आहे. चिल्ड्रन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेल्फियामधील लस शिक्षण केंद्राचे संचालक पॉल ए. ऑफिट यांनी सांगितलं की कोणतीही गोष्ट 100 टक्के प्रभावी नसते. लस घेतल्यास त्याचे फायदे हे जोखमीपेक्षा जास्त आहेत, हे आपण जाणतोच. लसीविषयी ही माहिती आपल्याला आहेच. लहान मुलांच्या लसीकरणाविषयी मोठी बातमी! COVOVAX ला या महिन्यात मिळणार मान्यता न्यूयॉर्क टाइम्सनं अमेरिकेतील 40 राज्यांच्या डेटाचं विश्लेषण केलं असता, त्यातून असं दिसून येतं की लसीकरण पूर्ण झालेल्यांपैकी कोरोनामुळे 0.2 ते 6 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लस ही पुरेशी प्रभावी (Effective) आहे. इतकेच नाही तर डेल्टा व्हॅरियंटविरुद्धही लसीचा परिणाम चांगला असल्याचं दिसून आलं आहे. `एनवायटी`ने सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन कडून मिळालेल्या माहितीआधारे दिलेल्या वृत्तानुसार, 18.7 कोटी अमेरिकी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं असून, त्यापैकी 7178 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 85 टक्के मृतांचं वय हे 65 वर्षापेक्षा अधिक होतं. पॉवेल यांना मल्टिपल मायलोमा हा आजार होता. त्यावर उपचार सुरू होते. हा प्लाझ्मा सेल कॅन्सर (Plasma Cell Cancer) असतो. यात प्लाझ्मा सेल अँटिबॉडीज तयार करतात. यात इम्यून सिस्टीमची भूमिका महत्त्वाची असते. एका अहवालानुसार, मल्टिपल मायलोमा असलेल्या रुग्णांवर लसीचा कमी परिणाम होण्याची शक्यता असते. माजी मंत्री पॉवेल यांच्या एका सहकाऱ्यानं सांगितलं की `पॉवेल यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये फायझर-बायोएनटेक लसीचा दुसरा डोस घेतला होता. गेल्या आठवड्यात त्यांना बुस्टर डोस देण्याचं नियोजन होतं. मात्र हा डोस घेण्यापूर्वीच ते आजारी पडले. पॉवेल यांना पार्किसन्स हा आजार देखील झाला होता, त्यावरही उपचार करण्यात आले होते.`
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या