• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • 19 वर्ष 10 महिने आणि 25 दिवसानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकेची सैन्य वापसी; तालिबाननं साजरा केला आनंद

19 वर्ष 10 महिने आणि 25 दिवसानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकेची सैन्य वापसी; तालिबाननं साजरा केला आनंद

अमेरिकी सैन्याच्या तीन सी-17 विमानांनी 30-31 ऑगस्टच्या मध्यरात्री काबूलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि यासोबतच अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्याच्या मोहिमेचा अंत (End of US Mission in Kabul) झाला.

 • Share this:
  काबूल 31 ऑगस्ट : तब्बल 19 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याच्या उपस्थितीचा शेवट झाला आहे. अमेरिकी सैन्याच्या शेवटच्या तीन विमानांनीही सोमवारी रात्री उशिरा काबूल विमानतळावरून उड्डाण केलं (American Soldiers Leave Afghanistan). मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकी सैन्याच्या तीन सी-17 विमानांनी 30-31 ऑगस्टच्या मध्यरात्री काबूलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं आणि यासोबतच अफगाणिस्तानातील अमेरिकी सैन्याच्या मोहिमेचा अंत (End of US Mission in Kabul) झाला. समोर आलेल्या वृत्तानुसार, न्यूजवीकचे संपादक नावीद जमाली यांनी केलं करत म्हटलं, की युद्धाचा शेवट झाला आहे. शेवटच्या विमानानं उड्डाण केलं आहे. सीएनएननं दिलेल्या वृत्ता असं म्हटलं आहे, की अमेरिकेच्या शेवटच्या तीन सी -१७ विमानांनी हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केलं आहे. हा अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या उपस्थितीचा अंत असू शकतो. आरटीचे मुराद गजदिएव यांनी ट्विट करत म्हटलं, की अमेरिकेचा उरलेले सैनिकही काबूल विमानतळावरुन निघाले आहेत. 19 वर्ष 10 महिने आणि 25 दिवस चाललेली ही लढाई अखेर संपली आहे. पाकिस्तानची जगाला धमकी, तालिबानला मान्यता दिली नाही तर पुन्हा 9/11 चा धोका अफगाणी पत्रकार मासून गजनवीनं काबूल विमानतळावरून निघण्याची तयारी करणाऱ्या अमेरिकी सैनिकांचा फोटो पोस्ट करत हा आपल्या देशावर कब्जा केल्याचा शेवटचा फोटो असल्याचं सांगितलं आहे. काबूल विमानतळावरुन अमेरिकी सैनिकांच्या वापसीनंतर तालिबानींनी हवेत गोळ्या झाडत आनंद व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आधी सप्टेंबर तर नंतर 31 ऑगस्टपर्यंत आपलं सैन्य अफगाणिस्तानातून परत घेणार असल्याचं म्हटलं होतं. डच्चू मिळाल्यावर लष्करात दाखल, दिग्गज क्रिकेटपटूची पुन्हा टीममध्ये एण्ट्री अशी आशा केली जात होती, की अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकी सैन्य आणखी काही दिवस तिथे थांबेल. मात्र, असं झालं नाही. तालिबान प्रवक्ता सुहैल शाहीन यानंही अमेरिकी सैन्यानं अफगाणिस्तान सोडल्याची माहिती देत हे अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेच्या सैन्य वापसीच्या घोषणानंतर आक्रमक झालेल्या तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. अफगाणिस्तानातून सैन्य वापसी करण्यासाठी अमेरिकेकडे ठरलेल्या वेळेनुसार आणखी २४ तास बाकी होते मात्र सैन्यानं त्याआधीच उड्डाण केलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: