डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर

गणेश चतुर्थीच्या दिवशी रिपब्लिकन पक्षाने स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती.

  • Share this:

अमेरिका, 20 सप्टेंबर : अमेरिकेच्या सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने अल्पसंख्याक समुदायाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक जाहिरात केली होती. या जाहिरातीमध्ये गणपतीच्या मुर्तीचा वापर करण्यात आला होता. स्थानिक हिंदूंनी आक्षेप घेतल्यानंतर पक्षाने माफी मागितली.

गणेश चतुर्थीच्या दिवशी रिपब्लिकन पक्षाने स्थानिक वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये गणपतीच्या प्रतिमा वापरली होती. या जाहिरातीत 'तुम्ही गाढवाची पूजा करणार की हत्तीची ?, तुम्हाला काय आवडेल ?' असा मजकूर लिहिला होता.

रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक चिन्ह हे हत्ती आहे. तर डेमोक्रेटीक पक्षाचे चिन्ह गाढव आहे.

अमेरिकेतील स्थायिक झालेल्या हिंदू समाजाने रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या जाहिरातीवर आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. हा अपमानजनक प्रकार असून आमच्या भावना दुखावल्या गेल्यात अशी नाराजी व्यक्त केली होती.

जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या पक्षाच्या वतीने जाहीर माफी मागण्यात आली. आम्हाला हिंदू समाजाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. हिंदू समाजाच्या प्रथा, परंपरांचा अपमान कऱण्याचा कोणताही हेतू नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो असं निवदेन पक्षाच्या वतीने देण्यात आलं.

ह्यूस्टनचे एक अधिकार समूह हिंदू अमेरिकन फाऊंडेशन (एचएएफ)ने फोर्ट बेंड काउंटी रिपब्लिकन पक्षाला जाहिरातीवर माफी मागण्यासाठी आवाहन केलं होतं.

=================================================

VIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू

First published: September 20, 2018, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading