या कारणांमुळे कासिम सुलेमानीला ठार केलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला खुलासा

या कारणांमुळे कासिम सुलेमानीला ठार केलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला खुलासा

'इराणविरुद्ध आम्ही आणखी कठोर निर्बंध लादणार आहोत. आम्हाला आखाती देशांच्या तेलाची गरज नाही.'

  • Share this:

वॉशिंग्टन 08 जानेवारी : इराणने अमेरिकेच्या इराकमधल्या तळांवर आज क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय. या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांचं आणि लष्करी तळांचं नुकसान झालेलं नाही. अमेरिकेचा एकही सैनिक जखमी झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. ट्रम्प म्हणाले, इराणविरुद्ध आम्ही आणखी कठोर निर्बंध लादणार आहोत. आम्हाला आखाती देशांच्या तेलाची गरज नाही. इराण दहशतवादाला खतपाणी घालत होता. आणि त्यांचा नायक हा कासिम सुलेमानी होता त्यामुळेच आम्ही त्याला ठार केलं असा खुलासा त्यांनी केला. इराणविरुद्धच्या लढाईत सगळ्या युरोपीयन देशांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, अमेरिका आणि इराकच्या भांडणाचे पडसाद आता जगभर उमटायला लागले आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाकडे लोटल जातंय का असाही प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहंम्मद यांनी मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केलंय. 94 वर्षांचे महाथिर हे जगातले सगळ्यात सगळ्यात बुजुर्ग पंतप्रधान समजले जातात. इराणचे दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या इराणने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्याच बरोबर अमेरिकेचा सूड घेण्याचीही धमकी दिलीय. इराकमधल्या अमेरिकेच्या तळावरही अमेरिकेने क्षेपणास्त्राने हल्ले केलेत. असं वातावरण तापलेलं असताना महाथिर यांनी मुस्लिम देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय.

मोदी होणार का नवे शांतीदूत? भारतानं मध्यस्थी केली तर स्वागत - इराण

अमेरिका आणि इराणच्या या युद्धात इराणला सध्या मुस्लिम देशांचीही साथ जशी मिळायला पाहिजे तशी मिळालेली नाही. यावरून मुस्लिम देशांमध्ये दोन गट पडलेले आहेत. इराण हा जगातला एकमेव शिया बहुल देश आहे. त्यामुळे शिया आणि सुन्नींच्या वादात इराण हा एकटा पडण्याची भीती आहे.

इराणने 12 क्षेपणास्त्रे डागली तरी काहीच नुकसान नाही, अमेरिकेनं असं काय केलं?

मुस्लिम देशांचं नेतृत्व आपल्याकडे असल्याचा दावा सौदी अरेबिया कायम करत असतो. सौदी अरेबिया आणि इराणचं कधीच पटलं नाही. त्यामुळे वर्चस्वाच्या या लढाईत सोदी अरेबिया हा अमेरिकेच्या बाजूनेच आहे. त्यामुळे मुस्लिम देशांमधली दरी कमी करण्यासाठी महाथिर यांनी हे आवाहन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 10:24 PM IST

ताज्या बातम्या