ट्रम्प यांनी इज्जत काढली; इम्रान खान यांना विचारले, कोठून आणता असले पत्रकार?

ट्रम्प यांनी इज्जत काढली; इम्रान खान यांना विचारले, कोठून आणता असले पत्रकार?

ट्रम्प फक्त भडकले नाही तर त्यांनी पाक पंतप्रधान खान यांच्या समोर संबंधित पत्रकाराची इज्जत देखील काढली.

  • Share this:

न्यूयाॉर्क, 24 सप्टेंबर: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान आणि तेथील मीडियाकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पोल खोल केली. संयुक्त राष्ट्र संघाच्या सहासभेत (UNGA) भाग घेण्यासाठी जगभरातील अनेक नेते सध्या न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अमेरिकेत आहेत. त्यांनी सोमवारी ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही देशांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने ट्रम्प यांना काश्मीर संदर्भात प्रश्न विचारला. या ट्रम्प फक्त भडकले नाही तर त्यांनी पाक पंतप्रधान खान यांच्या समोर संबंधित पत्रकाराची इज्जत देखील काढली.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतवेळी पाकिस्तानच्या पत्रकारांनी काश्मीर संदर्भातील त्यांचा अजेंडा पुढे रेटला. ट्रम्प यांनी अनेक वेळा पाकिस्तानच्या पत्रकारांना चुकीच्या प्रश्नांबद्दल थांबवले. तरी देखील एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले, काश्मीरमध्ये 50 झाले इंटरनेट बंद आहे, अन्न धान्य पुरवठा होत नाही अनेक गोष्टी बंद आहेत. यावर ट्रम्प म्हणाले तुम्ही जे बोलला आता तो प्रश्न नसून तुमचे स्वत:चे एक मत आहे. इतक नव्हे तर यावर ट्रम्प यांनी थेट इम्रान खान यांनाच विचारले, असले पत्रकार कोठून आणता तुम्ही?

अर्थात पाकिस्तानी पत्रकार एवढ्यावर थांबले नाहीत. दुसऱ्या एका पाकिस्तानी पत्रकाराने चक्क ट्रम्प यांना खुश करण्यासाठी त्यांचे कौतुक करु लागला. जर काश्मीर प्रश्न सोडवला तर तुम्हाला शांततेचा नोबेल मिळू शकले. यावर ट्रम्प यांनी म्हणाले, हा पुरस्कार (नोबेल) योग्य पद्धतीने दिला जात असता तर अन्य कामांसाठी मला नोबेल मिळाला असता. ते तर बराक ओबामा यांना पुरस्कार देतात. ओबामा अध्यक्ष झाले आणि त्यांना पुरस्कार दिला मला कळत नाही त्यांना का पुरस्कार देण्यात आला.

इम्रान खान यांच्यासमोर केले मोदींचे कौतुक

ट्रम्प यांनी इम्रान खान आणि पाकिस्तानी पत्रकारांसमोर हाऊडी मोदी या मेगा रॅलीचे कौतुक केले. या रॅलीत मोदींचे भाषण आक्रमक होते. त्यांनी ह्यूस्टनमध्ये 50 हजार लोकांची मने जिंकले. त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा मिळाल्याचे ट्रम्प म्हणाले.

...तर मध्यस्थी करू

पत्रकार परिषदेत तेव्हा काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी हा मुद्दा निघाला तेव्हा ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. पण दोन्ही देशांची सहमती असेल तरच ही गोष्ट शक्य होईल.

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 10:30 AM IST

ताज्या बातम्या