डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील मुस्लिमांचा पाठिंबा? वाचा काय आहेत एक्झिट पोल

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील मुस्लिमांचा पाठिंबा? वाचा काय आहेत एक्झिट पोल

नेहमी मुस्लिमविरोधी वक्तव्य करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पाठिंबा देणाऱ्या मतदारांमध्ये अमेरिकन मुस्लिम मतदारांची संख्या वाढली आहे.

  • Share this:

वॉशिग्टन, 2 सप्टेंबर: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) नेहमीच आपल्या मुस्लीम विरोधी धोरणांमुळे चर्चेत राहिले आहेत. 2017 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी 7 मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव केला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की, त्यामुळे अमेरिकेवर होणारे हल्ले कमी होतील. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी विरोधही केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी थोडं नरमाईचं धोरण अवलंबलं.

परंतु, तरीदेखील ट्रम्प यांचा मुस्लिमांना विरोध सुरूच होता. या सगळ्या घटना घडून सुद्धा अमेरिकेतले मुस्लीम बांधव ट्रम्प (American Muslim support Donald Trump) यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प तर दुसरीकडे जो बायडन एकमेकांच्या आमनेसामाने उभे आहेत. अमेरिकेतले एक्झिट पोल्स कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सीएएन (CNN) आणि अमेरिकेतल्या बऱ्याचशा एक्झिट पोलच्या आकड्यानुसार जो बायडन यांना काहीशी जास्त मतं मिळत आहेत.

हे ही वाचा-NASA Astronaut स्पेसमधून निवडणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष; कसं करणार मतदान पाहा

जून महिन्यापासून आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जो बायडन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काहीसे पुढेच आहेत पण ज्या मुस्लिम मतदारांकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध होणं अपेक्षित होतं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पारड्यात आपली मतं टाकणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. Institute for Social Policy and Understanding च्या अभ्यासानुसार स्वत: ट्रम्प सुद्धा मुस्लिम मतदारांच्या मतांची अपेक्षा करत नव्हते.पण 2016 पासून ट्रम्प यांच्या समर्थनार्थ उभ्या राहणाऱ्या अमेरिकन मुस्लिम नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. एका सर्वेक्षणाच्या माहितीनुसार गेल्या 4 वर्षात ट्रम्प यांचं समर्थन करणाऱ्या मुस्लिम नागरिकांची संख्या 10% ने वाढली आहे. अमेरिकेतील मुस्लिम मतदारांची संख्या 3 मिलिअनच्या पुढे आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांचा कौल हादेखील महत्त्वाचा ठरणारा भाग आहे. ही झाली एक्झिट पोलची आकडेवारी पण खऱ्या मतदानामध्ये मुस्लिम मतदार कोणाच्या पारड्यात आपलं लाखमोलाचं मत टाकणार हे येणारा काळच ठरवेल.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 2, 2020, 8:50 PM IST

ताज्या बातम्या