आई-बाप होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आलेलं दाम्पत्य, लेकीसह मायदेशी परतले पण...

आई-बाप होण्यासाठी अमेरिकेतून भारतात आलेलं दाम्पत्य, लेकीसह मायदेशी परतले पण...

आई बाप होण्यासाठी दाम्पत्य भारतात आलं आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. यामुळे त्यांना परत मायदेशी जाण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.

  • Share this:

वॉशिंग्टन, 09 मे : अमेरिकेतील सेठ मोजियर आणि मेग हे दाम्पत्य गेल्या 5 वर्षांपासून अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत ङोते. या काळात त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचीही मदत घेतली. मात्र त्यातही अपयश आले. शेवटी त्यांनी 2018 मध्ये एखादं बाळ दत्तक घेण्याचा विचार केला. त्यानंतर भारतात ही प्रक्रिया सोपी असल्यानं इथल्या मुलाला दत्तक घेण्याचं ठरवलं. सेठ आणि मेग मार्च महिन्यात तामिळनाडू इथं पोहोचलो होते. त्यानंतर मदुराई शहरातील एका अनाथ आश्रमातून सेल्वी नावाच्या मुलीला दत्तक घेतलं.

मोजियर दाम्पत्यानं सेल्वीला दत्तक घेतलं पण याच काळात कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यामुळे मोजियर कुटुंबिय इथं अडकून पडलं होतं. असं होणं अमेरिकन डिप्लोमॅट असलेल्या मोजियरसाठी नवीन नव्हतं. त्यानं  याआधीही अशा परिस्थितीतून मार्ग काढला आहे. त्यामुळं सगळं बंद होण्याच्या काही तास आधी त्याने अमेरिकन दूतावासाकडून कागदपत्रं तयार करून अमेरिका गाठली.

सध्या मोजियर बेथेस्डा, मेरिलँडमध्ये राहत आहेत. तिथल्या गव्हर्नरने लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश दिले आहे. यामुळे सेल्वीला तिच्या नव्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेटायला मिळालेलं नाही. याशिवाय तिला अमेरिकन खाद्यपदार्थ खाण्याचीही अडचण आहे. सेल्वीसाठी सेठ मोजियरची पत्नी मेग ऑनलाइन इंडियन रेसिपी पाहून जेवण तयार करत आहे.

डिसेंबरमध्ये सेठ आणि मेग हे सेल्वीसोबत पहिल्यांदा व्हिडिओ कॉलवर बोलले होते.  त्यानंतर तीन महिन्यांनी त्यांना दत्तक घेण्याची परवानगी मिळाली. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 2 मार्चला दिल्लीत पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. ते दोघेही भारतात आल्यानंतर 20 तासांच्या आतच देशाच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा आल्या होत्या.

पाहा VIDEO :पाककडून कोरोनाच्या संकटातही नागरिकांची लूट, विमानात प्रवाशी भडकले

आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ण बंद केला जाण्याची शक्यता होती त्यामुळे मुलीला भेटून लगेच परत जाणं हाच मार्ग होता. कारण दत्तकपत्र पूर्ण करण्यास वेळ लागणार होता. मात्र मोजियरनं सर्व प्रक्रिया वेगवान करण्याकडे लक्ष दिलं. मुलीचं दत्तकपत्र पूर्ण झाल्यानंतर मेग म्हणाली की,'मी जेव्हा केअरटेकरला भेटले तेव्हा त्यांचे आभार मानले. आम्ही सेल्वीच्या आयुष्यातली दोन वर्ष मिस केली. पण सेल्वीचा केअरटेकर्सनी चांगला सांभाळ केला.' आश्रमातून सेल्वीला दत्तक घेण्याआधी एक लहान कार्यक्रम झाला.

हे वाचा : कोरोनापासून वाचण्यासाठी प्यायले स्वत: बनवलेलं औषध आणि त्याच औषधाने घेतला जीव

मदुराईतून मोजियार दाम्पत्य सेल्वीसह 18 मार्चला दिल्लीत पोहोचले. पुढच्याच दिवशी असं समजलं की तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द होऊ शकतात. त्यामुळे इतर कागदपत्रं पूर्ण करण्यास दोनच दिवस उरले होते. अमेरिकेच्या इमिग्रेशन पेपरवर्कसाठी आठवडा लागतो पण मोजियरचं हे काम दोन दिवसांत पूर्ण झालं. विमानाच्या उड्डाणाआधी काही तास त्याला सर्व कागदपत्र मिळाली.

पाहा VIDEO : 'या' देशाच्या संसदेत राडा, खासदारांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी

First published: May 9, 2020, 6:25 PM IST
Tags: america

ताज्या बातम्या