गर्लफ्रेंड शोधा आणि व्हा लखपती, अमेरिकेतील व्यावसायिकाची अनोखी ऑफर

गर्लफ्रेंड शोधा आणि व्हा लखपती, अमेरिकेतील व्यावसायिकाची अनोखी ऑफर

अमेरिकेतील एक बिजनेसमन जेफ गेबहार्ट यांनी त्यांच्यासाठी गर्लफ्रेंड शोधण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. ऑफर ऐकून तुम्हीही चक्रावाल.

  • Share this:

वॉशिंग्टन, 21 फेब्रुवारी : प्रत्येकजण आपला जोडीदार स्वखुशीने निवडत असतो. आपल्याला आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती कशी असावी, कशी दिसायला हवी, तिचा स्वभाव कसा असावा या सर्व गोष्टी आपण ठरवतो. आणि आपल्या पसंतीने जोडीदाराची निवड करतो. सध्या ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ऑनलाईन डेटींग साईट. मुलगा मुलगी ऑनलाईन ऐकमेकाशी बोलतात आणि आपण ऐकमेकासाठी परफेक्ट आहोत का? हे ठरवतात. मात्र कधी तुम्ही आपल्यासाठी गर्लफ्रेंड शोधून द्या आणि पैसे मिळवा अशी ऑफर ऐकलेय का?. होय, हे खरचं आहे.

अमेरिकेतील एक बिजनेसमन जेफ गेबहार्ट यांनी त्यांच्यासाठी गर्लफ्रेंड शोधण्यासाठी एक डेटींग वेबसाईट लाँच केली आहे. या साईटच्यामदतीने जो कुणी व्यक्ती जेफ यांच्यासाठी गर्लफ्रेंड शोधून देईल, त्या व्यक्तीला 25 हजार डॉलर म्हणजेच 17 लाख 92 हजार रुपये दिले जाणार आहेत. जेफ गेबहार्ट यांची ही ऑफर ऐकून सगळ्यांचेच चक्रावले आहेत.

जेफ गेबहार्ट हे 47 वर्षाचे आहेत. त्यांच्या चांगल्या आणि वाईट सवयींसोबतच त्यांना स्वीकारणारी अशी मुलगी जेफ यांना गर्लफ्रेंड म्हणून हवी आहे.  खरंतर, जेफ हे ट्रेडीशनल डेटींगला कंटाळले आहेत. तर ऑनलाईन डेटींग पद्धतीवरूनही जेफ यांचं मन उठलं आहे. त्यामुळेच त्यांनी वेबसाईट लाँच करून त्यावर प्राईजमनी देण्याचं ठरवलं आहे. गेल्या आठवड्यातच जेफ यांनी ‘ डेट जेफ जी’ अशा नावाची डेटींग वेबसाईट लाँच केला आहे.

जेफ गेबहार्ट म्हणाले की, “नात्यात मी नेहमी साथ देणारा, दयाळू आणि मजा-मस्ती करणारा असा व्यक्ती आहे. विश्वास ठेवतो की, माझी लाईफ पार्टनरसुद्धा मी जसा आहे तसा माझा स्वीकार करेल. मला गर्लफ्रेंड म्हणून अशी व्यक्ती हवी आहे जिच्यात आत्मविश्वास असेल. जिच्यासोबत वेळ केव्हा निघून जाईल कळणारही नाही. आणि माझ्या आवडी-निवडींचा ती स्वीकार करेल. आणि दुसऱ्यांसोबत ती प्रेमाने वागेल.”

पेपरमध्ये 100 रुपये ठेवा आणि पास व्हा! कॉपी करण्यासाठी मुख्याध्यापकांची बंपर ऑफर

मात्र जेफ यांच्यासाठी गर्लफ्रेंड शोधण्याची ही ऑफर केव्हापर्यंत चालू राहणार याबाबत कोणतीही माहिती नाही आहे. परंतु जेफ यांची गर्लफ्रेंड म्हणून निवड होणं सोपं नाही आहे. जेफ यांची जी मुलगी गर्लफ्रेंड बनेल त्या मुलीला 25 हजार डॉलर मिळणार नाही आहेत. त्या मुलींना आधी जेफ यांच्या वेबसाईटवर अप्लाय करावं लागणार आहे. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हे पूर्ण करावा लागणार आहे. विशेष म्हणजे हा सर्व्हे क्लिनिकल मानसशास्त्रांकडून तयार करण्यात आला आहे. या सर्व्हेच्या आधारे जेफ यांना मुलीला न बघताच कोणत्या मुलीसोबत त्यांचा ताळमेळ बसत आहे याचा अंदाज येईल. यानंतर अखेर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

ट्रम्प यांच्या दौऱ्याची अशीही चर्चा, 15 किमीपर्यंत चालणार नाही मोबाईल

या कँपेनच्या आधारे जेफ यांना त्यांच्या आयुष्याची सोबती मिळेल की नाही याची खात्री नाही. मात्र जोडीदार शोधण्यासाठी 25 हजार डॉलरची ऑफर दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

First published: February 21, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading