Home /News /videsh /

जगात सर्वात सुंदर आहे या महिलेचा चेहरा; शास्त्रज्ञांनीही केलं मान्य, काय आहे कारण?

जगात सर्वात सुंदर आहे या महिलेचा चेहरा; शास्त्रज्ञांनीही केलं मान्य, काय आहे कारण?

आता शास्त्रीयदृष्ट्या सर्वांत सुंदर चेहऱ्याचा शोध लावण्यात आला आहे. यासाठी एका अभ्यासपद्धतीचा वापर करण्यात आला. शास्त्रीयदृष्ट्या चेहरा प्रमाणात आहे की नाही हे तपासून त्यावरून जगातला सर्वांत सुंदर चेहरा कोणत्या स्त्रीचा आहे, हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 21 जून : सुंदर दिसण्यासाठी सगळेच जण धडपडतात; मात्र पाहणारे कधी मनाचं सौंदर्य पाहतात, तर कधी शरीराचं. म्हणजेच सौंदर्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलू शकते. आता शास्त्रीयदृष्ट्या सर्वांत सुंदर चेहऱ्याचा शोध लावण्यात आला आहे. यासाठी एका अभ्यासपद्धतीचा वापर करण्यात आला. शास्त्रीयदृष्ट्या चेहरा प्रमाणात आहे की नाही हे तपासून त्यावरून जगातला सर्वांत सुंदर चेहरा कोणत्या स्त्रीचा आहे, हे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. तिच्याबद्दल जाणून घेऊ या. 'आज तक'ने याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. अमेरिकन अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड (American Actress Amber Heard) ही जगातली सर्वांत सुंदर स्त्री असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. State Of The Art Face Mapping Data नुसार किम कार्डेशियन (Kim Kardashian) आणि केट मॉस (Kate Moss) यांनाही तिनं मागे टाकलं आहे. चेहऱ्याचं सौंदर्य तपासण्यासाठी Beauty Phi च्या ग्रीक गोल्डन रेशोचा (Greek Ratio Of Phi) वापर करण्यात आला. चेहऱ्याचं सौंदर्य पाहण्यासाठी हजारो वर्षांपासून हा सिक्रेट फॉर्म्युला वापरला जातो. सगळ्या नैसर्गिक गोष्टींमध्ये रेशो अर्थात प्रमाण असतं, असं ग्रीक व्यक्तींचं म्हणणं असतं. जगातल्या सगळ्यात सुंदर चेहऱ्याचं सिक्रेटही याच फॉर्म्युलामध्ये आहे, असं त्यांना वाटतं. त्या मूल्यमापनानुसार अ‍ॅम्बर हर्ड या 36 वर्षीय अभिनेत्रीचा चेहरा 91.85 टक्के प्रमाणात (Most Beautiful Face In The World) आहे. लंडनच्या सर्जन डॉ. ज्युलियन डि सिल्वा यांनी अ‍ॅम्बर हर्डची टेस्ट केली. आधुनिक फेशियल मॅपिंग टेक्निक वापरून ही तपासणी केल्याचं त्यांनी सांगितलं. फोटोमध्ये डोळे, नाक, ओठ, भुवया, जबडा, हनुवटी आणि चेहऱ्याच्या आकाराचं प्रमाण तपासलं गेलं. चेहऱ्यावरच्या 12 मार्कर पॉइंट्सचं विश्लेषण करण्यात आलं. त्यावरून अ‍ॅम्बर हर्डचा चेहरा Greek Ratio Of Phi मध्ये 91.85 टक्के अचूक असल्याचं दिसलं. 'आम्ही एका नव्या कम्प्युटर मॅपिंग टेक्निकचा वापर करतो. या पद्धतीनुसार माणसांच्या सुंदर चेहऱ्यामागच्या रहस्यांचा शोध आम्ही घेतो,' असं लंडनमधल्या Centre For Advanced Facial Cosmetic And Plastic Surgery च्या डॉ. ज्युलियन डी सिल्वा यांनी सांगितलं आहे. याच पद्धतीनुसार किम कार्डेशियनच्या चेहऱ्याचीही तपासणी करण्यात आली. सौंदर्याच्या स्पर्धेत तिचा दुसरा क्रमांक लागला. तिचा चेहरा 91.39 टक्के अचूक आहे, तर ब्रिटिश सुपरमॉडेल केट मॉस तिसऱ्या स्थानावर आहे. तिचा चेहरा 91.06 टक्के अचूक आहे. चेहऱ्यावरचे उंचवटे, डोळे, ओठ, नाक या अवयवांचं माप प्रमाणात आहे का, हे तपासून या सौंदर्यवतींना क्रमांक देण्यात आले आहेत. प्रत्येकाचा चेहरा तितक्याच प्रमाणात असेल असं नाही; मात्र त्यातही अचूकतेच्या जवळ जाणारा चेहरा अमेरिकन अभिनेत्री अ‍ॅम्बर हर्ड हिचा असल्याचं आढळून आलं आहे.
    First published:

    Tags: America, Beauty tips, Face

    पुढील बातम्या