सावधान इंडिया! दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत; अमेरिकेने दिला हाय अलर्ट!

सावधान इंडिया! दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत; अमेरिकेने दिला हाय अलर्ट!

पाकिस्तानमधील दहशवादी संघटना भारतात हल्ले करण्याचा कट रचत आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 02 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीर(Jammu and Kashmir)साठीचे कलम 370 (Article 370)रद्द केल्यानंतर पाकिस्तान(Pakistan) मधील दहशवादी संघटना भारतात हल्ले करण्याचा कट रचत आहेत. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना रोखले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून होणारी घुसखोरी देखील थांबवली आहे. यामुळे दहशतवादी संघटना आणखी आक्रमक झाल्या आहेत. पाकमधील दहशतवादी भारतात हल्ले करण्याची शक्यता असल्याचा अलर्ट याआधी भारतीय गुप्तचर विभागाने दिला होता. आता अमेरिकेने देखील पाकिस्तानमधील दहशतवादी(Terrorist) भारतात हल्ले करू शकतात असा हाय अलर्ट दिला आहे. इतकच नव्हे तर जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना रोखले तर अशा प्रकारचे हल्ले रोखता येतील असे देखील अमेरिकेने म्हटले आहे.

भारतासंदर्भातील सुरक्षा विषयक अमेरिकचे सहाय्यक संरक्षण मंत्री रेंडल शाइवर यांनी याबाबतची माहिती दिली. काश्मीरसंदर्भात नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर दहशतवादी संघटना हल्ल्याचा विचार करत आहेत. अशा प्रकारचा संघर्ष व्हावा असे चीनला देखील वाटत नाही किंवा चीन त्यांचे समर्थन करणार नाही असे देखील शाइवर म्हणाले. चीन भलेही पाकिस्तानच्या बाजूने असला तरी दहशतवादाच्या मुद्यावर त्याचे कधीच समर्थन असणार नाही.काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्र संघात जाईल की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण जर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु झाली तर चीनकडून त्याला समर्थनच दिले जाईल असे शाइवर यांनी सांगितले.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 5 ऑगस्ट रोजी रद्द केले. त्याच बरोबर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लडाख हा भाग वेगळा केला. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना चीनने पाठिंबा दिला होता. मात्र जगातील अन्य कोणत्याही देशाने त्यांना समर्थन दिले नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर देखील पाकिस्तानाल कोणी साथ दिली नाही. त्यानंतर पाकिस्तानने भारताला युद्धाची धमकी देखील दिली. इतक नव्हे तर पाकिस्तानने भारताशी व्यापार बंद केला आणि हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी घातली.

VIDEO : सायन कोळीवाडा इथे मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम; पाहा काय म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 01:23 PM IST

ताज्या बातम्या