अमेरिकेत मोठी खळबळ; डोनल्ड ट्रंपविषयी POST च्या बातमीमागचं सत्य काय?

अमेरिकेत मोठी खळबळ; डोनल्ड ट्रंपविषयी POST च्या बातमीमागचं सत्य काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप पायउतार; ट्रंप यांनी व्हाईट हाउस सोडलं, या अर्थाची बातमी वॉशिंग्टन पोस्टसारख्या प्रतिष्ठित अमेरिकन दैनिकानं दिल्याची बातमी अमेरिकेत वाऱ्यासारखी पसरते आहे. POST च्या बातमीमागचं सत्य काय?

  • Share this:

वॉशिंग्टन डीसी, 17 जानेवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप पायउतार; ट्रंप यांनी व्हाईट हाउस सोडलं, या अर्थाची बातमी वॉशिंग्टन पोस्टसारख्या प्रतिष्ठित अमेरिकन दैनिकानं दिल्याची बातमी अमेरिकेत वाऱ्यासारखी पसरते आहे. POST च्या बातमीमागचं सत्य काय?

'UNPRESIDENTED', Trump hastily departs White House, ending crisis' या मथळ्याची बातमी The Washigton Post च्या मास्टहेडखाली छापली गेली. पण हा अंक नीट पाहिला असता यावरची तारीख दिसते आहे 1 मे 2019. म्हणजेच ट्रंपविरोधकांनी ट्रंप प्रशासनाचा निषेध म्हणून हा फेक न्यूजपेपर छापून घेतला आहे.

स्वतः वॉशिंग्टन पोस्टने आमच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणा करत आहे, आम्ही याची माहिती घेत आहोत, असं ट्वीट केलं आहे.

विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान व्हाईट हाउसच्या बाहेरही काही लोक या फेक न्यूजपेपरच्या प्रती वाटत होते. या पेपरचे आणि ते वाटणाऱ्यांचे फोटो भराभर व्हायरल होत आहेत. ट्रंप विरोधकांची संख्या वाढते आहे आणि ट्रंप यांच्या धोरण आणि प्रशासनाला विरोध म्हणून लोकांनी या पद्धतीचा वापर केला आहे.

First published: January 17, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading