दरम्यान, इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने दोन दिवसांपूर्वी क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इराणने 12 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यात अमेरिकेचे 80 सैनिक मारल्याचा दावा इराणकडून केला होता. मात्र, 'ऑल इज वेल' असे ट्वीट करून सगळं काही ठीक असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं. इराणच्या हल्ल्यानंतर काही तासांतच तेहरान विमानतळावर एक विमान दुर्घटनाही घडली होती. यामध्ये विमानातील सर्व 180 प्रवाशांचा मृत्यू झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, 'ऑल इज वेल! इराणकडून इराकमधील दोन लष्करी हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. जीवितहानी आणि नुकसानाची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सगळं काही ठीक आहे. सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य आहे. उद्या सकाळी आम्ही यासंबंधी निवेदन जारी करु'. ट्रम्प यांनी इराणकडून झालेल्या हल्ल्यात आमचं नुकसान झालेलं नाही असा दावा केला आहे. इराणने आम्ही जनरल कासिम सुलेमानीच्या मृत्यूचा बदला घेऊ असा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेच्या दुतावासावरही इराणने हल्ला केला. अमेरिकेने एक दिवस अगोदर त्यांची आखातामधील जहाजे त्यादृष्टीने सज्ज ठेवली होती. इराणकडून इराकमध्ये असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला पण त्यात अमेरिकेचं फारसं नुकसान झालं नाही. यामध्ये अमेरिकेच्या बॅलेस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निग सिस्टिमने मोठी भूमिका पार पाडली. बॅलेस्टिक मिसाइल डागल्यास त्याची माहिती अगोदर मिळावी यासाठी एक रडार सिस्टिम अमेरिकेनं विकसित केली आहे. बॅलेस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निंग अशा नावाने विकसित करण्यात आलेली ही सिस्टीम शीतयुद्धाच्या काळात तयार करण्यात आली होती. तेव्हा सोव्हिएत युनियनसोबत अमेरिकेचा संघर्ष सुरू होता. अमेरिका-इराण तणावाचा परिणाम विमानसेवेवर अमेरिका-इराण यांच्यातील तणावामुळे मुंबईहून युरोप व अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना 30 ते 40 मिनिटांचा फेरा वाढणार आहे. यामध्ये टोरोन्टो, न्यूयॉर्क, स्वित्झर्लंड, म्युनिक, पॅरिस, लंडन, अॅमस्टरडॅम, कैरो, फ्रॅन्फफर्ट, सेशेल्स, इस्तंबुल व नैरोबी या शहरांसाठीच्या सुमारे 20 उड्डाणांचा समावेश आहे. याखेरीज होमरुझच्या आखाताला लागून असलेल्या कुवैत सिटी, ओमान येथे जाणाऱ्या विमानांनादेखील खबरदारीचा म्हणून आखाती देशांमधील सौदी अरेबियाकडून वळसा घालून जाण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. या कारणांमुळे कासिम सुलेमानीला ठार केलं, ट्रम्प यांचा खुलासा इराणने अमेरिकेच्या इराकमधल्या तळांवर आज क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा केलाय. या हल्ल्यात अमेरिकेच्या सैनिकांचं आणि लष्करी तळांचं नुकसान झालेलं नाही. अमेरिकेचा एकही सैनिक जखमी झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. ट्रम्प म्हणाले, इराणविरुद्ध आम्ही आणखी कठोर निर्बंध लादणार आहोत. आम्हाला आखाती देशांच्या तेलाची गरज नाही. इराण दहशतवादाला खतपाणी घालत होता. आणि त्यांचा नायक हा कासिम सुलेमानी होता त्यामुळेच आम्ही त्याला ठार केलं असा खुलासा त्यांनी केला. इराणविरुद्धच्या लढाईत सगळ्या युरोपीयन देशांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, अमेरिका आणि इराकच्या भांडणाचे पडसाद आता जगभर उमटायला लागले आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाकडे लोटल जातंय का असाही प्रश्न विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहंम्मद यांनी मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केलंय. 94 वर्षांचे महाथिर हे जगातले सगळ्यात सगळ्यात बुजुर्ग पंतप्रधान समजले जातात. इराणचे दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार केलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या इराणने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्याच बरोबर अमेरिकेचा सूड घेण्याचीही धमकी दिलीय. इराकमधल्या अमेरिकेच्या तळावरही अमेरिकेने क्षेपणास्त्राने हल्ले केलेत. असं वातावरण तापलेलं असताना महाथिर यांनी मुस्लिम देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय. अमेरिका आणि इराणच्या या युद्धात इराणला सध्या मुस्लिम देशांचीही साथ जशी मिळायला पाहिजे तशी मिळालेली नाही. यावरून मुस्लिम देशांमध्ये दोन गट पडलेले आहेत. इराण हा जगातला एकमेव शिया बहुल देश आहे. त्यामुळे शिया आणि सुन्नींच्या वादात इराण हा एकटा पडण्याची भीती आहे. मुस्लिम देशांचं नेतृत्व आपल्याकडे असल्याचा दावा सौदी अरेबिया कायम करत असतो. सौदी अरेबिया आणि इराणचं कधीच पटलं नाही. त्यामुळे वर्चस्वाच्या या लढाईत सोदी अरेबिया हा अमेरिकेच्या बाजूनेच आहे. त्यामुळे मुस्लिम देशांमधली दरी कमी करण्यासाठी महाथिर यांनी हे आवाहन केले आहे.Two rockets hit Iraqi capital's Green Zone, reports AFP news agency, quoting security sources.
— ANI (@ANI) January 8, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America news, American president donald trump, Donald Trump, International news, Iraq