Home /News /videsh /

दुष्काळात तेरावा महिना! ‘कोरोना’सह वादळाचा कहर, संपूर्ण शहर उद्ध्वस्त

दुष्काळात तेरावा महिना! ‘कोरोना’सह वादळाचा कहर, संपूर्ण शहर उद्ध्वस्त

अमेरिकेतल्या (america) टेनेसी (Tennessee) प्रांतात आलेल्या भीषण वादळामुळे (Tornadoes) तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे, 35 जण बेपत्ता आहेत.

    वॉशिंग्टन, 05 मार्च : संपूर्ण जगात कोरोनाव्हायरस (Coronavirus) थैमान घालतंय. अशात अमेरिकेत (America) फक्त कोरोनाच नव्हे तर वादळानंही कहर केला आहे. या वादळानं (Tornadoes) संपूर्ण शहर उद्ध्वस्त केलं आहे. टेनेसी  (Tennessee) प्रांतात आलेल्या भीषण वादळामुळे तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे, 35 जण बेपत्ता आहेत. अमेरिकेच्या टेनेसी प्रांतात भीषण वादळ आलं. ज्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारती, घरं कोसळलीत. सार्वजनिक वाहतूक, पूल, विजेचे खांबही जागोजागी कोसळलेत. 100 पेक्षा जास्त इमारती जमीनदोस्त झाल्यात. फक्त नॅशव्हिले शहरातील 40 इमारतींचा यात समावेश आहे. यामुळे तब्बल 16 किलोमीटरपर्यंत कचराच कचरा झाला आहे. हे वाचा - जीवघेणा ‘कोरोना’! या व्हायरसची लागण झाल्यास खरंच मृत्यू अटळ आहे का? टेनेसीच्या प्रशासनाने सांगितल्यानुसार, टेनेसीत आलेलं हे सर्वात भयानक संकट आहे. टेनेसी एमरजन्सी मॅनेजमेंट एजन्सीने सांगितलं की, यामुळे नॅशव्हिले शहरात सर्वात जास्त संकट झालं आहे. विमानतळावरही नुकसान झालं आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडलेली घरं आणि इमारतींमधून सर्वात जास्त लोकांना बाहेर काढलं आहे. अद्यापही 35 लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जातं आहे. टेनेसीचे गव्हर्नर बिल ली यांनी राज्यात आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. हे वाचा - 'हँडशेक, किस, मिठी' अजिबात नको; 'कोरोना'च्या भीतीनं 'या' देशांनी बदलल्या सवयी दरम्यान अमेरिकेत कोरोनाव्हायरसमुळे बुधवारपर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, America news

    पुढील बातम्या