News18 Lokmat

अमेरिकेचा युनेस्कोतून काढता पाय

युनेस्को इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळेच अमेरिका या संस्थेतून बाहेर पडत आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2017 11:42 AM IST

अमेरिकेचा युनेस्कोतून काढता पाय

13 ऑक्टोबर: संयुक्त राष्ट्रांची सांस्कृतिक संस्था असलेली युनेस्कोतून अमेरिका बाहेर पडत आहे. युनेस्को इस्रायलविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळेच अमेरिका या संस्थेतून बाहेर पडत आहे.

या संस्थेतून बाहेर पडत असल्याचं गुरुवारी अमेरिकेनं जाहीर केलं आहे. या संस्थेतून अमेरिका ३१ डिसेंबर २०१८ पासून बाहेर पडणार आहे. तोपर्यंत अमेरिका युनेस्कोची पूर्ण सदस्य राहणार आहे. संस्थेमध्ये मूलभूत सुधारणा करण्याची गरज आणि सातत्याने इस्रायलविरोधी भूमिका घेतल्याने अमेरिकेला वाटणारी चिंता या निर्णयातून प्रतिबिंबित होते आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नॉएर्ट यांनी म्हटलं आहे.

युनेस्कोच्या महासंचालक आयरिना बोकोव्हा यांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला निर्णय कळवला आहे. मात्र बिगरसदस्य म्हणून अमेरिका संस्थेसोबत असल्याचंही महासंचालकांना सूचित करण्यात आलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय दोघांनाही नुकसानीचा ठरणार आहे असं बोकोव्हा यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...