अमेरिकेत UFO नंतर आकाशात दिसल्या विचित्र हालचाली, महिलेनं शूट केला VIDEO

अमेरिकेत UFO नंतर आकाशात दिसल्या विचित्र हालचाली, महिलेनं शूट केला VIDEO

अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या मुख्यालयाने काही दिवसांपूर्वी UFO चा व्हिडिओ शेअर केला होता.

  • Share this:

वॉशिंग्टन, 03 मे : काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागन इथून उडत्या तबकड्यांबाबत तीन व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. त्यानंतर आता टेक्सासमध्ये एक विचित्र असा प्रकाश दिसल्यानं लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. टेक्सास शहरात रात्री दहाच्या दरम्यान आकाशात तीन विचित्र प्रकारचे प्रकाशाचे गोळे दिसले. एकाच वेळी दिसणारा हा प्रकाश कधी जवळ येताना तर कधी दूर जाताना दिसत होता. असाच प्रकार आणखी एका ठिकाणी अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी झाला होता.

आकाशात दिसणारे प्रकाशाचे हे ठिपके युएफओ होते की आणखी काही याची माहिती कोणाकडेही नाही. हे प्रकाशाचे गोळे जवळ येत असल्याचंही दिसत होतं. माजी खासदार आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते हॅरी रीड यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला होता.

एका महिलेनं आकाशात होणाऱ्या या विचित्र हालचालींचा व्हिडिओ तयार केला. तेव्हा शूट करताना ती प्रचंड घाबरली होती. तिने 11 एप्रिलला हा व्हिडिओ शूट केला. याबाबतचे वृत्त ABC13 ने दिलं आहे. महिलेनं हा व्हिडिओ युट्यूबवरसुद्धा अपलोड केला होता.

हे वाचा : कोरोना योद्ध्याने बेवारस मृतदेहाला दिला खांदा, कर्तव्य पार पाडत दिली प्रेरणा

पेंटागनने काही दिवसांपूर्वी अधिकृत व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये अज्ञात य़ुएफओ दिसत होते. हे व्हिडिओ 2004 आणि 2015 मध्ये प्रशिक्षणासाठी करण्यात आलेल्या उड्डाणावेळी शूट कऱण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकन नौदलाने अधिकृतपणे ही गोष्ट मान्यही केली होती.

हे वाचा : कोरोनाने होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूमागे 'हे' कारण, भारतीय वंशाच्या डॉक्टरचा इशारा

First published: May 3, 2020, 11:09 PM IST
Tags: ufo

ताज्या बातम्या