मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Coronavirus: शास्रज्ञांकडून अज्ञात जीनचा शोध, उपचारांत मदत होण्याचा दावा

Coronavirus: शास्रज्ञांकडून अज्ञात जीनचा शोध, उपचारांत मदत होण्याचा दावा

अमेरिकेतील संशोधकाने कोरोना विषाणूच्या आतापर्यंत अज्ञात असलेल्या एका जिनचा (Genes) शोध लावला आहे. कोरोना विषाणूला प्रतिकारशक्ती देण्याचं काम आणि महामारी पसरवण्याची शक्ती हाच जीन देतो असा शास्रज्ञांचा अंदाज आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

न्यूयॉर्क, 13 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसच्या (Coronavirsu) बचावासाठी अद्यापही औषध किंवा लस विकसित (Corona Vaccine) झालेली नाही. जगभर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील संशोधकाने कोरोना विषाणूच्या आतापर्यंत अज्ञात असलेल्या एका जिनचा (Genes) शोध लावला आहे. कोरोना विषाणूला प्रतिकारशक्ती देण्याचं काम आणि महामारी पसरवण्याची शक्ती हाच जीन देतो असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाचं औषध तयार करण्यासाठी किंवा लस विकसनासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो.

लस किंवा औषध तयार करायला मदत -

कोरोना विषाणूच्या 15 जिनोमची माहिती मिळाली आहे, ज्याचा उपयोग औषध किंवा लस तयार करायला होऊ शकतो, असं अमेरिकी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या संशोधकांचं मत आहे. ई-लाइफ जर्नलमध्ये हा नवा अभ्यास प्रकाशित झाला आहे. या जीनच्या आत जीन असून रुग्णाच्या शरीरात प्रतिकृती तयार करण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो असं शास्रज्ञांचं मत आहे.

विषाणूवर नियंत्रण मिळवता येईल -

अमेरिकी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीतील संशोधक या संशोधनाचे प्रमुख लेखक चेस नेल्सन म्हणाले, ‘जिनच्या आत असलेला हा जीन कोरोना विषाणूचं शस्र असू शकतं ते कदाचित विषाणूला त्याची प्रतिकृती तयार करायला मदत करत असावं आणि रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करत असावं. जिनच्या आत असलेल्या जीनचा शोध लागल्यामुळे कोरोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे.’

(वाचा - खूशखबर! Corona Vaccine च्या उत्पादनास सुरुवात, 3 कोटी डोस तयार असल्याचा दावा)

संशोधकांनी सार्स कोव्ह-2 जिनच्या आत असलेल्या ज्या जीनचा शोध लावला आहे, त्याला orf3d असं नाव दिलं आहे. ज्यातल्या प्रोटीनमध्ये अधिक क्षमता आहे. त्यांनी सांगितलं की orf3d आधी सापडलेल्या पँगोलिन कोरोना विषाणूतही होतं ज्यातून असं दिसून येतं की सार्स कोव्ह-2 आणि संबंधित विषाणूच्या विकासावेळीच या जिनचा विकास झाला असावा.

अँटिबॉडी तयार करायला मदत -

रुग्णाच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी तयार झालेल्या अँटिबॉडींविरुद्ध orf3d हे स्वतंत्र असलेलं जीन जोरदार काम करतं. यावरून लक्षात आलं की, नव्या जिनपासून माणसाला संक्रमण होताना नवं प्रोटिन तयार झालं. नेल्सन म्हणाले, ‘आम्हाला अजूनही या जिनची कार्यप्रणाली किंवा त्याचं वैद्यकीय महत्त्व माहीत नाही, पण टी-सेल्स या जिनला ओळखतात जेणेकरून अँटिबॉडी तयार करू शकेल असा आमचा अंदाज आहे. हा जीन स्वत: चा बचाव कसा करतो यावर आता अभ्यास करायचा आहे.’

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus