मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'...तर तिसरं महायुद्ध होईल'; युक्रेन-रशिया युद्धादरम्यान अमेरिकेचा गंभीर इशारा

'...तर तिसरं महायुद्ध होईल'; युक्रेन-रशिया युद्धादरम्यान अमेरिकेचा गंभीर इशारा

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान (Russia-Ukraine war) अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये युद्धासाठी आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान (Russia-Ukraine war) अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये युद्धासाठी आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान (Russia-Ukraine war) अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये युद्धासाठी आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

वॉशिंग्टन 12 मार्च : रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान (Russia-Ukraine war) अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये युद्धासाठी आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. आम्ही नाटोच्या जमिनीतील प्रत्येक इंचाची रक्षा करू. मात्र युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धाच्या मैदानात उतरणार नाही. त्यांनी नाटो देशांनाही इशारा दिला की त्यांनी असं काही पाऊल उचलल्यास हा रशिया आणि नाटो यांच्यात सरळ संघर्ष होईल आणि यामुळे तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं (Third World War).

बायडन यांनी हे विधान अशावेळी केलं आहे, जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) हे रशियाच्या आक्रमणाविरोधात अमेरिका आणि नाटो देशांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. शुक्रवारीही झेलेंस्कीने अमेरिकेसोबत फोनवर बातचीत केली. झेलेंस्की यांनी सांगितलं की आमचं बराच वेळ बोलणं झालं. यादरम्यान मी युद्धाची परिस्थिती आणि रशियन सैनिकांकडून सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगितलं. आम्हाला हे जाणवलं की रशियाला रोखण्यासाठी त्यांच्यावर आणखी प्रतिबंध लावणं गरजेचं आहे.

या चर्चेनंतर अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंधांची घोषणा केली. याअंतर्गत रशियन व्होडका, हिरे, सीफूड यांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ही घोषणा करताना बायडन म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आक्रमक आहेत आणि त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. त्यांनी सांगितलं की अमेरिका आणि युरोपियन युनियनने निर्णय घेतला आहे की ते व्यापारात रशियाला प्राधान्य देणारी कायमस्वरूपी व्यवस्था देखील समाप्त करतील. यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.

Satellite Image: युक्रेनवरचा धोका वाढला, रशियाकडून कीववर मिसाईलचा पाऊस

अमेरिकेने याचप्रमाणे क्युबा आणि उत्तर कोरियासोबतचे सामान्य व्यापारी संबंध संपवले आहेत. व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटलं आहे की G7 देशांनी निर्णय घेतला आहे की रशियाला यापुढे IMF आणि जागतिक बँकेसारख्या संस्थांकडून कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नाही.

ब्रिटन सरकारनंही रशियन संसदेचे कनिष्ठ सभागृह ड्यूमाच्या 386 सदस्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. रशियाने युक्रेनच्या लुहान्स्क आणि डोनेस्तक प्रांतांना स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून मान्यता देण्यात ड्युमाच्या या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटनच्या फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) ने शुक्रवारी सांगितले की निर्बंधांमुळे रशियन खासदारांना ब्रिटनमध्ये प्रवास करण्यास, त्यांची मालमत्ता वापरण्यास आणि ब्रिटनमध्ये व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला जाईल.

युक्रेनवर युद्ध पुकारलेले Putin उठतात उशिरा दुपारी,अशी आहे त्यांची Lifestyle

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस म्हणाले: "आम्ही पुतीनच्या युक्रेनवर बेकायदेशीर आक्रमणात सहभागी असलेल्यांना आणि या युद्धाला पाठिंबा देणार्‍यांना लक्ष्य करत आहोत." आम्ही रशियावर दबाव टाकणं थांबवणार नाही आणि निर्बंधांद्वारे रशियन अर्थव्यवस्थेवर परिणाम करत राहू. ते म्हणाले की, ब्रिटन आणि त्यांचे मित्र राष्ट्र युक्रेनच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यासाठी आम्ही युक्रेनला मानवतावादी मदत, संरक्षणात्मक शस्त्रे आणि राजनैतिक उपायांसह मदत करत राहू.

First published:
top videos

    Tags: Joe biden, Russia Ukraine