24 तासांत ट्रम्प यांनी बदलला सूर, आधी दिली धमकी आता मोदींचं कौतुक

24 तासांत ट्रम्प यांनी बदलला सूर, आधी दिली धमकी आता मोदींचं कौतुक

भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध देण्याची तयारी दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी मोदी महान असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 08 एप्रिल : कोरोनाच्या संकटाने महासत्ता असलेल्या अमेरिकेचे सध्या कंबरडे मोडले आहे. यासाठीच अमेरिकेने भारताकडे मदत मागितली होती. ही मदत मागितल्यानंतर 24 तासांच्या आत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला धमकीही दिली होती. आता त्याच पंतप्रधान नरेंद मोदींचं कौतुक ट्रम्प यांनी केलं आहे. भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध देण्याची तयारी दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी मोदी महान असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

अमेरिकेच्या न्यूज चॅनल फॉक्स न्यूजशी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन विषयावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी झालेल्या संपूर्ण वादाबाबत माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी, "आम्हाला परदेशातून बरीच औषधे दिली जात आहेत, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही याबद्दल बोललो कारण बरीच औषधे भारतातून येत आहेत", असे सांगितले. यावेळी ट्रम्प यांनी, "मी पंतप्रधान मोदींना विचारले की ते औषधे देतील का? ते विलक्षण आहे. भारताने आपल्या गरजेपोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, पण ते योग्य आहे. पंतप्रधान मोदी महान आणि खूप चांगले आहेत. खूप चांगल्या गोष्टी अद्याप भारतातून आल्या नाहीत", असे म्हणत मोदींचं कौतुक केलं.

वाचा-मृत्यूचं केंद्र बनतंय 'हे' गजबजलेलं शहर, 24 तासांत 731 लोकांचा मृत्यू

याआधी भारताला दिली होती धमकी

यापूर्वी ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली होती. ट्रम्प यांनी, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील बंदी भारताने मागे घेतली नाही तर अमेरिका भारतावर कारवाईचा विचार करू शकेल, असे सांगितले होते. कोरोना विषाणू-संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या औषधासाठी संपर्क साधला होता.

वाचा-coronavirus : ....तर 15 मे पर्यंत शाळा-कॉलेज, मॉल आणि धार्मिक स्थळ बंद राहणार

भारताने औषधांच्या पुरवठ्यास मान्यता दिली आहे

ट्रम्प यांनी दबाव टाकल्यानंतर भारताने 14 औषधांच्या निर्यातीवरील बंदी हटवली. पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध परवाना श्रेणीमध्येच आहेत. मात्र त्यांच्या मागणीवर सतत नजर ठेवले जाईल. परंतु मागणीनुसार पुरवठा होत असल्यास काही प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले की, कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी भारताने नेहमीच असे म्हटले आहे की अशा कठीण परिस्थितीत संपूर्ण जगाला एकत्र लढावे लागेल. तसेच माणुसकीबाबत देखील विचार करावा लागेल. या रोगाचा सर्वाधिक त्रास असलेल्या गरजू देशांना ही औषधे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा-3 हजार मृत्यू, 81 हजार लोकं संक्रमित! आज 76 दिवसांनी वुहान पार करणार लक्ष्मणरेखा

ट्रम्प यांनी केली बंदी मागे घेण्याची विनंती

काही दिवसांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय पोल करण्यात आला होता. ज्यामध्ये हजारो डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. 30 देशांमधील 6200 फिजिशियन यात होते. त्यांनी म्हटलं की कोरोनाशी लढण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी औषध आहे. जे क्लोरोक्वीनचं एक रुप आहे. सध्याच्या सर्व्हेमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी स्पेनमध्ये सर्वाधिक वापर केला गेला. तिथल्या 72 टक्के डॉक्टरांनी हे घेण्याचा सल्ला दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी औषधाबाबत दावा केला असला तरी जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र कोरोनाला सध्या कोणतंही औषध रोखू शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

First published: April 8, 2020, 10:32 AM IST

ताज्या बातम्या