भारताच्या अन्नसुरक्षा कायद्याला अमेरिकेचा विरोध

भारताच्या अन्नसुरक्षा कायद्याला अमेरिकेचा विरोध

भारताचा अन्नसुरक्षा कायदा धोक्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारताकडून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती.

  • Share this:

  13 डिसेंबर: भारतात अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा मानला जाणारा कायदा म्हणजे अन्न सुरक्षेचा कायदा. पण अमेरिकेनं भारताच्या या अन्नसुरक्षा कायद्याला तीव्र विरोध केला आहे.यामुळे हा कायदा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

अर्जेंटिनात सुरू असलेल्या जागतिक व्यापार परिषदेत ही  घटना घडली आहे.  भारताचा अन्नसुरक्षा कायदा धोक्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारताकडून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती. याला कडाडून विरोध केलाय. याआधी अशा अनेक गोष्टींना अमेरिकेकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारत यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अन्न सुरक्षा कायदा भारतात 2013 साली संसदेत पास करण्यात आला होता. हा कायदा गरीबांना  अन्न  मिळावं या ध्येयाने बनवला गेला आहे. त्यात महिला विशेषत: गर्भवती महिलांसाठी या कायद्यात काही तरतूदी आहेत. त्यामुळे या कायद्याबाबतीत आता भारत काय धोरण स्वीकारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 08:37 AM IST

ताज्या बातम्या