नवऱ्याने पोटच्या 5 मुलांचा खून केल्यानंतरही पत्नी म्हणाली 'शिक्षा करू नका', कारण...!

नवऱ्याने पोटच्या 5 मुलांचा खून केल्यानंतरही पत्नी म्हणाली 'शिक्षा करू नका', कारण...!

महिलेच्या या मागणीमुळे सुरुवातीला कोर्टात सगळ्यांना धक्का बसला.

  • Share this:

अमेरिका, 13 जून : पोटच्या 5 मुलांची नवऱ्याने हत्या केल्यानंतर त्याला शिक्षा करू नका अशी मागणी एका महिलेने केली आहे. महिलेच्या या मागणीमुळे सुरुवातीला कोर्टात सगळ्यांना धक्का बसला. नवऱ्याने माझ्या 5 मुलांची हत्या केली हे खंर आहे पण त्यांना सोडून द्या अशी मागणी महिलेकडून करण्यात आली आहे. कोर्ट जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. पण नवऱ्याला शिक्षा देऊ नका असं महिलेचं म्हणणं आहे.

माझी मुलं त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम करायचे. त्यामुळे त्यांच्या वडिलांना शिक्षा झालेली मुलांना आवडणार नाही. त्यामुळे नवऱ्याला शिक्षा करू नका अशी विनंत कैजर नावाच्या महिलेने कोर्टात केली आहे. अमेरिकेच्या कॅरोलीना कोर्टामध्ये हा प्रकार घडला आहे.

खरंतर, टिमोथी जोनस जूनिअर नावाच्या एका व्यक्तीने 2014मध्ये स्वत:च्या 5 मुलांची निर्घृणपणे हत्या केली होती. या गुन्ह्यामध्ये कोर्टाने जोनसला दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणार होती. पण त्याआधीच आरोपी जोनच्या पत्नीने जोनसला सोडून देण्याची मागणी कोर्टासमोर केली.

काय म्हणाली जोनसची पत्नी...

'माझ्या मुलांना मारताना जोनसला त्यांच्यावर जरापण दया आली नाही. त्याने निर्दयीपणे त्यांची हत्या केली आहे. पण तरीदेखील जोनसला शिक्षा करू नका अशी मी कोर्टाला विनंती करते. कोर्टासमोर मी माझी नाही तर माझ्या मुलांची भूमिका मांडत आहे. मुलांच्या त्यांच्या वडिलांवर खूप जीव होता. जोनसला शिक्षा झालेली त्यांच्या मुलांना आवडणार नाही'

त्यापुढे म्हणाल्या की, 'आमचा घटस्फोट झाल्यानंतर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी जोनसकडे दिली याचा मला पश्चाताप होत आहे. माझी मुलं सारखी माझ्या डोळ्यासमोर असतात. पण मुलांचा माझ्यापेक्षा वडिलांवर जीव होता'

VIDEO : स्पेशल व्यक्तीकडून बर्थ डे गिफ्ट आलं का? आदित्य ठाकरे म्हणतात...

First published: June 13, 2019, 9:01 PM IST

ताज्या बातम्या