32 दिवस व्हेंटिलेटरवर होता पती, फक्त 3 तास पत्नीला भेटला अन् घडला चमत्कार

32 दिवस व्हेंटिलेटरवर होता पती, फक्त 3 तास पत्नीला भेटला अन् घडला चमत्कार

प्रेम आणि विश्वास कोणत्याही रोगाला मात देऊ शकतं, हे या प्रकरणावरून कळतं.

  • Share this:

मॅसेच्युसेट्स, 28 एप्रिल : कोरोना विषाणूचे रुग्ण आणि डॉक्टर यांची अमेरिकेत परिस्थिती वाईट आहे. उपचारादरम्यान, डॉक्टरांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. उत्तम उपचारांच्या सुविधा असूनही, अमेरिकेत कोरोनामुळे 56 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या सगळ्यात एका कोरोना रुग्णाची रंजक कहाणी समोर आली आहे.

अमेरिकेचा मॅसेच्युसेट्सचा रहिवासी असलेल्या 49 वर्षीय जिम बेलो हा व्यवसायाने वकील असून त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. याआधी जिमला कधीच कोणता आजार झाला नाही. मात्र कोरोनामुळं त्याची परिस्थिती एवढी वाईट झाली की डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती. तीन मुलांचा वडील असलेल्या जिमवर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मार्चच्या सुरूवातीला त्याला तीव्र ताप आला. त्यामुळं तो 32 दिवस व्हेंटिलेटरवर होता. यावेळी, त्याला कृत्रिम हार्ट-लंग मशीनच्या मदतीने 9 दिवस जिवंत ठेवले गेले.

वाचा-भारत कोरोनाला हरवणार, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आकड्यांतून मिळाला मोठा दिलासा

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, डॉ एम्मी रुबिन यांनी जिमची पत्नी किमला 'जगण्याची शक्यता आहे. मात्र खरं सांगायचं तर जास्त आशाही नाही आहेत'. जिमच्या फुफ्फुसांनी जवळजवळ काम करणे बंद केले होते. डॉक्टर म्हणाले की त्याच्या फुफ्फुसाचा एक्स-रे पाहिल्यानंतर त्यांना कळले की जिम जगू शकत नाही. सगळे उपाय करूनही जिमच्या तब्येतीत काही फरक नव्हता. जेव्हा जिमची तब्येत नाजूक झाली तेव्हा डॉक्टरांनी त्यांची पत्नी किमला बोलवून घेतले आणि पतीची भेट घेण्यास सांगितले.

वाचा-स्पेनमध्ये लॉकडाऊन शिथिल, मृत्यूच्या तांडवानंतर स्पेनमधील काही आनंदी PHOTOS

डॉक्टरांनी किमला केवळ 15 मिनिटे जिमला भेटण्याची परवानगी दिली. मात्र त्यानंतर किम तीन तास जिमसोबत होती. या भेटीनंतर जणू चमत्कार घडला आणि जिमची तब्येत सुधारण्यास सरुवात झाली. पॉल कुरियर नावाच्या डॉक्टरांनी सांगितले की, "किमच्या प्रेमानं जिमला वाचवलं. ती 3 तास जिमच्या पलंगाजवळ बसून होती, तिचा आत्मविश्वास खरं औषध आहे".

वाचा-मुंबईहून 1600 किमी चालत गाठलं घर, क्वारंटाइन केल्यानंतर 6 तासांतच...

जिमनं पत्नीची भेट घेतल्यानंतर त्याची प्रकृती सुधारू लागली. अखेर 14 एप्रिल रोजी जिमला व्हेंटिलेटरमधून काढले गेले आणि स्वत: श्वास घेऊ लागला. आता डॉक्टरांनी जिमला डिस्चार्ज दिला आहे. प्रेम आणि विश्वास कोणत्याही रोगाला मात देऊ शकतं, हे या प्रकरणावरून कळतं.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 28, 2020, 2:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या