अंतराळात रस्ता चुकली टेस्लाची स्पोर्ट्स कार; मंगळाची कक्षा ओलांडून गेली सूर्यमालेबाहेर

अंतराळात रस्ता चुकली टेस्लाची स्पोर्ट्स कार; मंगळाची कक्षा ओलांडून गेली सूर्यमालेबाहेर

मूळ योजनेनुसार ही स्पोर्ट्स कार व आतील डमी ड्रायव्हर यांना मंगळ-पृथ्वी यांच्या दरम्यानच्या कक्षेत जायचं होतं. पण ही कार इच्छित मार्ग सोडून पुढे आणखी अंतराळात जात आहे.

  • Share this:

09 फेब्रुवारी : इलॉन मस्क या अब्जाधीश अमेरिकी उद्योगपतीच्या स्पेसएक्स कंपनीने मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घालण्यासाठी पाठविलेली 'टेस्ला रोडस्टर' ही स्पोर्ट्स कार मार्गभ्रष्ट होऊन अंतराळात भरकटली आहे. ही कार मंगळाची कक्षा ओलांडून सूर्यमालेच्या बाहेर असलेल्या उल्का आणि अशनींच्या पट्ट्यात शिरली असून ती कुठवर पोहोचेल, कुठे जाऊन स्थिरावेल, बाह्य अवकाशाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत किती काळ टिकेल, याविषयी अनिश्चितता आहे.

इलॉन मस्क यांनी ही माहिती देताना लिहिले की, 'मूळ योजनेनुसार ही स्पोर्ट्स कार व आतील डमी ड्रायव्हर यांना मंगळ-पृथ्वी यांच्या दरम्यानच्या कक्षेत जायचं होतं. पण ही कार इच्छित मार्ग सोडून पुढे आणखी अंतराळात जात आहे. ग्रहमालेला लागून असलेल्या उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्याच्या दिशेने ती जात आहे. रॉकेटच्या इंजिनाचा अपेक्षेहून जास्त रेटा मिळाल्याने असे झाले असावे.'

अंतराळात सोडलेल्या या स्पोर्ट्स कारच्या नेमक्या भ्रमणमार्गाचा नकाशा स्पेस एक्स कंपनीनं अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे ती नेमकी कुठपर्यंत जाऊन पोहोचेल याचा अंदाज करणं कठीण आहे. ग्रहमालेतील परस्परांना छेद देणाऱ्या गुरुत्वाकर्षण कक्षांच्या ओढाताणीनं ती नेमकी कुठे स्थिरावेल हेही अनिश्चित आहे. परंतु असंख्य उल्का आणि अशनींनी भरलेल्या पट्ट्यातून जाताना तिची त्यापैकी एकाशी टक्कर होणं किती काळ टळेल याची अटकळ करणेही अशक्य आहे.

First published: February 9, 2018, 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading