News18 Lokmat

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इफ्तार पार्टीला मुस्लीम संघटनांची पाठ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदा इफ्तार पार्टीचं आयोजन करणार आहेत. पण...

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2018 05:29 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इफ्तार पार्टीला मुस्लीम संघटनांची पाठ

अमेरिका, ता. 07 जून : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. पण ट्रम्प यांच्या मुस्लीम विरोधी वक्यव्यामुळे अनेक मुस्लीम संघटनांनी त्यांच्या या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकला आहे.

खरंतर, मागच्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी परंपरागत सुरू असलेली बंद केली होती. 1990 मध्ये बिल क्लिंटन यांनी औपचारिकरित्या या इफ्तार पार्टीची सुरूवात केली होती. पण या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यामागची वैचारिक मुळं 1805मध्ये थॉमस जेफरसन यांच्याशीही जोडलेली होती.

दरम्यान, बुधवारी रात्री या व्हाईट हाऊसवर इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं पण काही मुस्लीम संघटनांनी या पार्टीकडे पाठ फिरवली.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव साराह सँडर्स यांच्या सांगण्यानुसार, 'वेगवेगळ्या समुदायातून 30-40 लोक या पार्टीला सहभागी झाले होते.' पण ट्रम्प यांच्या इफ्तार पार्टीवेळीच आम्ही वेगळी इफ्तार पार्टी सुरू करू असं काही विरोधी मुस्लीम संघटनांकडून सांगण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...