कोरोनाने मोडलं अमेरिकेचं कंबरडं, 24 तासांत 18 हजार लोकांना कोरोनाची लागण तर 345 जणांचा मृत्यू

कोरोनाने मोडलं अमेरिकेचं कंबरडं, 24 तासांत 18 हजार लोकांना कोरोनाची लागण तर 345 जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 1 लाखांहून अधिक झाली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 मार्च : कोरोना विषाणूमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. असे असले तरी, महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने सांभाळलेल्या ट्रॅकरनुसार अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 1 लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूचा प्रसार किती वेगाने होत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो, गेल्या 24 तासांत तब्बल 18 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, 345 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एकूण 1500 लोकांचा जीव या विषाणूने घेतला आहे.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूची 1 लाख प्रकरणे समोर आली आहेत. जगात कोरोना विषाणूची सर्वाधिक संख्या आता अमेरिकेत आहे आणि संक्रमित लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे इटलीमधील परिस्थिती नियंत्रणात येत नाही. गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे इटलीत 969 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची लागण? एका बातमीने पाक हादरलं

चीनच्या वुहान शहरासारखी अवस्था न्यूयॉर्कची झाली आहे. अमेरिकेचा हा प्रदेश सर्वाधिक प्रभावित झाला आहे. अमेरिकेत संक्रमित झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कच्या रूग्णालयात ऑक्सिजन, कॅथेटर आणि औषधांचीही कमतरता असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा-'चला कोरोना पसरवूया', Infosysमधील इंजिनिअरच्या धक्कादायक पोस्टने खळबळ

न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन डॉक्टरांना भीती आहे की न्यूयॉर्कमधील परिस्थिती अशीच राहिल्यास चीनच्या वुहानपेक्षा याचे परिणाम वाईट होतील. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील वाहन कंपन्या जनरल मोटर्स आणि फोर्ड यांना वाहने तयार करण्याऐवजी व्हेंटिलेटर मशीन तयार करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ट्रम्प यांनी व्हेंटिलेटरच्या कमतरतेचा सामना करत जगभरातील देशांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनामुळं अमेरिकेतही लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे.

वाचा-Coronavirus चा महाभयानक चेहरा, परिस्थितीनुसार बदलतो रूप

कोरोनामुळे अमेरिकेत होवू शकतो 80 हजार लोकांचा मृत्यू

चीन आणि इटली नंतर आता कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलं आहे. अमेरिकेचे आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचं केंद्र आहे. दररोज बाधित आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत 385 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अमेरिकेत 80 हजार लोकांचा मृत्यू होवू शकतो अशी भीती Institute for Health Metrics and Evaluation ने (IHME) व्यक्त केली आहे.

First published: March 28, 2020, 9:47 AM IST

ताज्या बातम्या