मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनाचा कहर! अमेरिकेत 22000 जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 5 लाखांहून अधिक

कोरोनाचा कहर! अमेरिकेत 22000 जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या 5 लाखांहून अधिक

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या विज्ञान आणि इंजीनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी केलेल्या संख्येनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत  5521303 लोकांना संसर्ग झाला असून 175350 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोगांना याची लागण झाली असून 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्या विज्ञान आणि इंजीनियरिंग केंद्राकडून (सीएसएसई) जारी केलेल्या संख्येनुसार अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 5521303 लोकांना संसर्ग झाला असून 175350 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राजीलमध्ये आतापर्यंत 3532330 लाख लोगांना याची लागण झाली असून 113318 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संपूर्ण अमेरिकेत आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे

  • Published by:  Meenal Gangurde
न्यूयॉर्क, 13 एप्रिल : अमेरिकेत (America) कोरोना (Coronavirus) या जीवघेण्यात आजाराने कहर माजवला आहे. न्यूयॉर्क शहरात चीन आणि ब्रिटनपेक्षाही जास्त रुग्णसंख्या आहे. या शहरात कोरोना (Covid - 19) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाखांहून अधिक झाली आहे. न्यूयॉर्क शहरात रविवारी 5695 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून तब्बल 1 लाख 4 हजार 410 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात आतापर्यंत 6898 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण अमेरिकेत आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजाराहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि 22 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार चीन आणि ब्रिटनपेक्षा जास्त केसेस न्यूयॉर्क शहरात आहेत. न्यूयॉर्क राज्यात संसर्ग झालेल्यांचा आकडा 90000 पर्यंत पोहोचला आहे. येथे आतापर्यंत 10000 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासियो यांनी रविवारी सांगितले की, गेला आठवडा सर्वच रुग्णांलयांसाठी कठीण होता. गव्हर्नर एन्ड्र्यू कुओमो यांनी सांगितले की 24 तासांत राज्यात 758 जणांचा मृत्यू झाला आहे. नर्सिंग होममध्ये 3600 जणांचा मृत्यू अमेरिकेतील नर्सिंग होम आणि वैद्यकीय केंद्रांमध्ये आतापर्यंत 3600 हून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप याबाबत नेमका आकडा समोर आलेला नाही. काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अशा केंद्रांमध्ये 10 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यामुळे मृत्यूची संख्या जास्त असू शकते. जागरणने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. मे महिन्यात अमेरिकेची अर्थव्यवस्था होण्याची शक्यता कोरोना आजारामुळे ठप्प झालेली अमेरिकेतील अर्थव्यवस्था मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अंशत: स्वरुपात खुली करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे 33 कोटी लोकसंख्या असलेले अमेरिकेचे जनजीवन ठप्प झाले आहे. संबंधित - कोरोना वॉरिअर्सची ताकद वाढणार, मुंबईतील नामवंत डॉक्टरांचा कोरोनाच्या लढाईत सहभाग धक्कादायक! मुंब्रा पोलीस ठाण्यात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण संपादन - मीनल गांगुर्डे
First published:

पुढील बातम्या