कारला झालेला अपघात कोणालाच नव्हता माहीत, 6 दिवसांनंतर 'ती' अशी सापडली जिवंत

कारला झालेला अपघात कोणालाच नव्हता माहीत, 6 दिवसांनंतर 'ती' अशी सापडली जिवंत

अमेरिकेच्या एका महिलेच्या कारला अॅरिझोना प्रांतातल्या एका राजमार्गावर अपघात झाला. या अपघातात राजमार्गावरून खाली पडून तिची गाडी एका झाडाला अडकली. पण...

  • Share this:

अॅरिझोना, (अमेरिका) 01 नोव्हेंबर : अमेरिकेच्या एका महिलेच्या कारला अॅरिझोना प्रांतातल्या एका राजमार्गावर अपघात झाला. या अपघातात राजमार्गावरून खाली पडून तिची गाडी एका झाडाला अडकली. पण या अपघातातील महिला मात्र तब्बल 6 दिवसांनंतर जिवंत सापडली आहे.


अॅरिझोनाच्या सुरक्षा विभागाच्या एका वृत्तानुसार, 12 ऑक्टोबरला एक 53 वर्षाची महिला राष्ट्रीय राजमार्गावर 60 च्या जवळ असलेल्या विकेनबर्गवरून जात होत्या. त्यावेळी त्यांचा गाडीवरून ताबा सुटला आणि त्या खाली कोसळल्या.


या अपघाताबद्दल राज्य पोलिसांनी सांगितलं की, या महिलेची गाडी राजमार्गावरून गटांगळ्या घेत तब्बल 50 फूट खाली पडली आणि झाडाला अडकली. पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे या अपघात होताना कोणीही पाहिलं नाही. कोणीही या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी नव्हता त्यामुळे या या अपघाताची कोणालाच माहिती नव्हती.


18 ऑक्टोबरला अॅरिझोना हायवे मॅनेजर टीमने हावयेचं रेलिंग तुटलेलं पाहिलं आणि त्यांनी जवळ जाऊन खाली पाहिलं तर त्यांना झाडाला गाडी अडकलेली दिसली. त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.


धक्कादायक CCTV: तो आला, गळा धरला आणि सपासप केले 9 वार


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडीला बाहेर काढलं पण तेव्हा गाडीत कोणीच नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी तो रस्ता शोधला जिथून महिला खाली कोसळली. तेव्हा त्यांना 457 मीटर लांब रस्त्यावर चालताना ही महिला गंभीर जखमी अवस्थेत सापडली.


यापुढे या महिलेने जे सांगितलं त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. या महिलेने सांगितलं की, अपघातानंतर अनेक दिवस ती गाडीतच होती. त्यानंतर काही करून तिथे बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हळूहळू रोडकडे येण्याचा प्रयत्न केला पण मोठ्या प्रमाणात जखमी असल्यामुळे मी रोडवर पोहचू शकले नाही.


या सगळ्यानंतर महिलेला हेलिकॉप्टरच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी त्याचं हे जिवंत उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. तब्बल 6 दिवसांनंतरही त्याला आज जिवंत आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यांचं पोलिसांनी सांगितलं.


VIDEO : ‘अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे’, मुलायम सिंहांच्या छोट्या सुनेचं मत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 08:19 PM IST

ताज्या बातम्या