ख्रिसमसचं सुरू होतं सेलिब्रेशन अन् घडली दुर्घटना, अमेरिकेतील भयंकर स्फोटाचा VIDEO

या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर स्फोटाची माहिती देणाऱ्याला 10 हजार डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे.

या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर स्फोटाची माहिती देणाऱ्याला 10 हजार डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे.

  • Share this:
    नेशविल, 26 डिसेंबर : कोरोनाची दहशत असताना देखील नागरिक सर्व नियमांचं पालन करून ख्रिसमसचा आनंद लुटत असतानाच भयंकर दुर्घटना घडली आहे. अमेरिकेतील नेशविल इथे भयंकर स्फोट झाला. अमेरिकेत ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू असताना हा स्फोट झाल्यामुळे दहशत पसरली आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूला असलेल्या गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. वित्तहानी झालीच पण त्यासोबत या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कारमध्ये जाणीवपूर्वक हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा स्फोट घडवण्यासाठी गाडीचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या FBI कडून तपास सुरू आहे. या स्फोटाची भीषणता दाखवणारा व्हिडीओ रॉयर्सनं जारी केला आहे. हे वाचा-जीव धोक्यात घालून तरुणाचा सायकलवर खतरनाक स्टंट, पाहा श्वास रोखायला लावणारा VIDEO स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. या स्फोटाची माहिती देणाऱ्याला FBI कडून 10 हजार डॉलर्सचं बक्षीस देखील देण्यात येणार आहे. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीनं या संदर्भात एक फेसबुक पोस्ट देखील लिहिली आहे. त्यानं या स्फोटाचं वर्णन केलं आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की गाड्या हवेत उडाल्या आणि त्याचा चुराडा झाला तर झाडं देखील उन्मळून पडली सगळं बेचिराख झालं. हा स्फोट घडवून आणण्यामागे कुणाचा काय हेतू होता माहीत नाही पण त्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. ख्रिसमस आणि सर्वसाधारणपणे ज्या परिसरात स्फोट घडला तो भाग वर्दळीचा आणि पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. सुदैवानं इथे खूप वर्दळ नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असलीतरी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: